गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

आता ब्रेड टिकवा दोन महिने

WD
बुरशीजन्य जीवाणूंकडून आंबविलेल्या ब्रेड हा नाशवंत पदार्थ आहे. फार तर तो दोन ते तीन दिवस टिकतो, परंतु हाच ब्रेड दोन ‍महिन्यांपर्यंत जसाच्या तसा आणि अगदी ताजा ठेवणे शक्य होणार आहे. टेक्सास विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून एका विशेष धातूचा मायक्रोवेव्ह तयार केला असून, या मायक्रोवेव्हमधून निघणार्‍या किरणांमुळे ब्रेडमधील बुरशीजन्य जिवाणू पूर्णपणे नष्ट झाल्याचा त्यांनी दावा केला आहे. अमेरिकेतील 'मायक्रोझॅप' या कंपनीच्या विनंतीवरून या शास्त्रज्ञांनी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्राचा वापर दुसर्‍या खाद्यपदार्थांसाठी करण्याबाबत संशोधन करण्यात येत असल्याचेही 'मायक्रोझॅप' कंपनीच्या अधिकार्‍यांनी सांगितले. मायक्रोझॅपचे प्रमुख डॉन स्टल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत सर्वाधिक प्रमाणात खाद्यपदार्थांची नासाडी होते. ही नासाडी रोखण्याबाबत उपाय शोधण्यासठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात, खरेदी केलेल्या खाद्यपदार्थांपैकी 40 टक्के खाद्यपदार्थ फेकून देण्याकडे अमेरिकी नागरिकांचा कल दिसून येतो. फेकण्यात आलेल्या या खाद्यपदार्थांमुळे दरवर्षी सुमारे 165 कोटी डॉलर वाया जात असल्याचेही सर्वेक्षणात उडकीस आले आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांच्या बचतीसाठी हा शोध महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.