बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By वेबदुनिया|

पुरुषांना आवडतात साडीतील स्त्रिया

कालानुरूप स्त्रियांच्या पोशाखात अमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. सध्या तर मेट्रो सिटीतील महिलांचे राहणीमान पूर्ण बदलले आहे. स्त्रिचा पोशाख कितीही भारीचा असो, पण तो साडक्षसमोर फिकाच पडतो, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. बहुतांश पुरुषांना साडी परिधान केलेल्या स्त्रिया अधिक आवडतात, अस एका राष्ट्रीय इंग्रजी साप्ताहिकाने केलेल्या सेक्स सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे.
WD


या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 44.5 टक्के पुरुषांनी साडी हाच महिलांसाठी योग्य आणि आकर्षक पोशाख असल्याचे म्हटले आहे. साडी हे शालीनतेचे प्रतीक असले तरीसुद्धा त्याच्याकडे सेक्स सिम्बॉल म्हणून पाहण्याकडे पुरुषांचा कल असतो. बहुतांश मंडळी अशाच पद्धतीने विचार करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. साडी परिधान केल्यामुळे स्त्रीच्या सौंदर्यस्थळांना एक वेगळा गेटअप येतो. त्यामुळे साडीतील स्त्रियाच पुरुषांना अधिक आवडतात. तत्पूर्वी, याआदी एका इंग्रजी नियतकालिकाने केलेल्या सर्वेक्षणातूनही काहीसे असेच निष्कर्ष समोर आले होते.