गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

प्राचीन अंटार्क्टिका होते बरेच उष्ण!

PR
सध्याच्या अंटा‍र्क्टिकामध्ये केवळ बर्फच बर्फ दिसून येत असले तरी सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी अशी स्थिती नव्हती. त्यावेळी अंटार्क्टिका किंवा दक्षिण ध्रुवाचा हा परिसर बराच उष्ण होता आणि तिते हिरवळही होती. वनस्पतींची वाढ होण्यासाठीचे पोषक वातावरण त्या ठिकाणी होते.

अंटार्क्टिकातील बर्फाखालील पानांचे अवशेषांचा अभ्यास करून संशोधकांनी याबाबतची माहिती दिली आहे. सुमारे दोन कोटी वर्षांपूर्वी अंटार्क्टिकातील उन्हाळ्याचे तापमान अकरा अंश सेल्सिअस असे. सध्या या ठिकाणी उन्हाळ्यातील तापमान सात अंशांपर्यंत जाते. त्यावेळी असलेले तापमान काही वनस्पतींच्या वाढीसाठी अनुकूल होते. त्यावेळी वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण दहा लाखांमधील 400 ते 600 भागांइतके होते. कालांतराने सर्व गोष्टींमध्ये फरक पडत गेला आणि सध्याचे रूप या ध्रुवाला आले. याबाबात नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीच्या संशोधकांनी संशोधन केले आहे. तेथील जंग यून ली यांनी याबाबतची माहिती दिली.