गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By

यौनशक्ती वाढवणारे किडे, किंमत 60 लाख प्रति किलो

काय आपल्याला माहीत आहे की हिमालय क्षेत्रात असा किडा आहे जो लोकांची सेक्स पॉवर वाढवतो. हा हिमालयीन वियाग्रा म्हणूनही ओळखला जातो. दुर्गम आणि खतरनाक स्थानांवर सापडणार्‍या या किड्याचे नाव यार्सागुम्बा असे आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 60 लाख रुपये प्रति किलो आहे.
 
यार्सागुम्बा किडा असला तरी त्याला आयुर्वेदिक जडी बुट्टीच्या श्रेणीत ठेवला जातो. हा हिमालयाच्या उंच भागात सापडतो. या हिमालयीन वियाग्राचे काहीही साइड इफेक्ट नाही. श्वास आणि मूत्रपिंडचा त्रास असलेल्या लोकांसाठी हा फार उपयोगी आहे. हा रोग प्रतिकारशक्ती शक्ती वाढवतो आणि माणसाला वयस्कर होण्यापासून रोखतं.

हा किडा भारत आणि तिबेटमध्ये सापडत असला तरी मुख्यत: हा नेपाळमध्ये अधिक संख्येत सापडतो. हा तपकिरी रंगाचा किडा 2 इंच लांब असतो. खाण्यात गोड असलेले हे किडे काही विशेष झाडांवर जन्म घेतात आणि यांचा जीवनकाळ सहा महिने असतो.
 
हिवाळ्यात झाडांमधून निघणार्‍या रसातून यांचा जन्म होतो आणि मे- जून पर्यंत हे आपले जीवनचक्र पूर्ण करून मरतात. मेल्यानंतर हे किडे पसरून जातात. या किड्यांची चीनमध्ये खूप डिमांड आहे म्हणूनच मे- जून मध्ये यांना गोळा करण्यासाठी नेपाळी पर्वतांकडे वळतात.
2001 पर्यंत नेपाळ सरकारने या किड्यावर बंदी लावली होती पण लोकांची मागणी लक्षात घेत यावरून बंदी हटविण्यात आली. नेपाळ सरकारने याचा उत्पादक क्षेत्रात यार्सागुम्बा सोसायटी बनवली आहे जी याचा निर्यात करते. यावर नेपाळ सरकार 20000 प्रति किलो रॉयल्टी वसूल करते.