मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: गुरूवार, 16 एप्रिल 2015 (10:52 IST)

आयलायनर लावून नजरेला धोका

आयलायनर लावत असाल, तर जरा सांभाळून लावा आणि तेदेखील डोळंच आतल कडेला जाणार नाही याची काळजी घ्या. कारण आयलायनरमधील कण हे डोळ्यांच्या बुबुळावर असणारा संरक्षक पडदा ङ्खाडतात असा निष्कर्ष संशोधकांनी लावला आहे. इंग्लंडमधील वॉटर्लू युनिव्हर्सिटीच्या सेंटर ऑफ कॉन्टॅक्टलेन्स रिसर्चमधील अँलिसन एनजी यांच्या नेतृत्वाखालील संशोधक पथकाने हा अहवाल दिला आहे. त्यासाठी त्यांनी चमकदार कण असणारे आयलायनर लावलेल्या व्यक्तींचे डोळे दोन तासांनी तपासले, तर डोळतील अश्रूनलिकांशी संपर्क आल्यावर या कणांची अधिक हालचाल होऊन ते पुढे सरकतात व बुबुळांवर असणारा पातळ पडदा चिरून ते डोळ्यात इतरत्र पसरतात हे सिद्ध झाले आहे. आयलायनर लावल्यावर त्यातील 30 टक्के कण पाचच मिनिटात डोळ्यांच्या पडद्यात घुसखोरी करतात हे त्यांना आढळून आलं. वास्तविक हा थर बाहेरील कणांपासून डोळ्यांचं संरक्षण करतो. मात्र आयलायनरमधील हे कण त्यालाही दाद देत नाहीत व ते डोळ्यात घुसतात. काही कण बाहेर फेकले जातात, तर काही डोळ्यातच नाहीसे होतात. त्यामुळेच मग डोळ्यांची आग होते, ते चुरचुरतात. मात्र हे नुकसान इतक्यावरच राहात नाही, तर डोळ्यांच्या आतल्या कडेवर आयलायनर लावल्यामुळे डोळ्यांना रोगजंतूंचा संसर्ग, डोळ्यांचे आजार होण्याची तसंच भविष्यात दृष्टी मंदावण्याची शक्यता असते. डोळ्यांच्या आतील कडेवर आयलायनर लावल्यामुळे हे परिणाम अधिक जास्त व अधिक लवकर होतात. डोळ्यांची स्वत:ची अशी स्वच्छता व सुरक्षेची व्यवस्था असली तरीही आयलायनरमधील मेण, रंग, तेल, सिलिकॉन, गम इ. पदार्थ त्याला दाद न देता नुकसान पोहोचवतात. खरं तर पेन्सिल आयलानरमधील बॅक्टेरियांमुळेही डोळ्यांना त्रास होऊ शकतो. मात्र त्यासाठी प्रत्येकवेळी आयलायनर पेन्सिल वापरताना तिला नवं टोक काढून मगच ती वापरावी, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.