बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (17:07 IST)

मेंदीचा इतिहास

* लावण्यवतीचा रंग खुलवणारी मेंदी अगदी पुरातन काळापासून स्त्रीच्या साजशृंगाराचे रंग खुलवत आली आहे.
 
* इजिप्तमध्ये भारताप्रमाणेच हजारो वर्षांपूर्वी मेंदीचा वापर होत होता. तेथील पिरॅमिड्समध्ये सुरक्षित ठेवलेल्या ममींचे हातपाय मेंदीने रंगविलेले आढळतात.
 
* मेंदीचे उत्पादन चौदाव्या शतकात प्रामुख्याने जेसलमेर, माळवा नागौर या प्रदेशात मोठय़ा प्रमाणात होत असे. त्यातल्या त्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा या प्रदेशात मेंदीची लागवड मोठय़ा प्रमाणावर होते.
 
*मेंदीरेखनाचे व्यावसायिक काम करणार्‍या महिलांची भारतातील संख्या सुमारे १0 ते १५ हजार एवढी आहे. त्यापैकी चार-पाच हजार महिला मुंबई, कलकत्ता, दिल्लीत आहेत. या कलाकार महिलांत राजस्थानी, गुजराथी, मारवाडी, व उत्तर प्रदेशातील महिलांचा प्रामुख्याने समावेश आहे. वधूच्या मेंदीरेखनासाठी त्या साधारणपणे १२५ ते २00 रु. घेतात.
 
*आरोग्याच्या दृष्टीनेदेखील मेंदी उपयुक्त आहे. शरीराचे तापमान वाढू नये म्हणून मेंदीचा लेप उपायकारक ठरतो. खाज, खरूज, व्रण यांवरही मेंदी उपयुक्त ठरते.