testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अवताराची गोष्ट : चित्रपट परीक्षण

awatarachi goshata
Last Modified शुक्रवार, 26 डिसेंबर 2014 (15:10 IST)
चित्रपट : अवताराची गोष्ट
निर्माता
: सचिन साळुंके
दिग्दर्शक : नितीन दीक्षित
सं‍गीत : गंधार
कथा-पटकथालेखक : नितीन दीक्षित
कलाकार : आदिनाथ कोठारे, मिहिरेश जोशी, यश कुलकर्णी, सुलभा देशपांडे, लीना भागवत, सुनील अभ्यंकर, रश्मी खेडेकर.
अवतार धारण करणारी माणसे इतरांपेक्षा वेगळी आणि असामान्य म्हणविली जातात. त्याच धाटणीचा या चित्रपटाचा नायक आहे. या चित्रपटाची कथा फिरते ती लहान मुलांच्या भावविश्वाभोवती. त्यांच्या कल्पनाविष्काराभोवती. रूपेरी पडद्यावर पदार्पण करणारा मिहिरेश जोशी (व्यक्तिरेखेचं नाव कौस्तुभ) आणि य़श कुलकर्णी (व्यक्तिरेखेचे नाव मंग्या). ती दशावतारमयी जगातील कल्पनाविश्वात सुरस चमत्कारिक अन् साहसी जगात रममाण झालेले हे दोन चिमुरडे आणि त्यांच्या भावविश्वाची ही कथा आहे.

आजच्या काळातील लहान, अल्लड मुलामुलींवर घरच्यांपेक्षा आजूबाजूची तरुणाई यांना पाहून, त्यांचे वागणे-बोलणे पाहून काही नकळतपणे संस्कार होत असतात. ते चांगले झाले तर या वयातील मुलामुलींच्या जडणघडणीवर त्याचा खोलवर चांगला परिणाम घडू शकतो. आज अवतार म्हटलं की सगळे त्या अवतार झालेल्या माणसासमोर हात जोडून उभे राहतील, अशी परिस्थिती झाली आहे. आपण माणूस आहोत आणि देव संकल्पनेमुळे माणूस असल्याचा आपल्यात न्यूनगंड निर्माण झाला आहे, अशी नेमकी परिस्थिती आपल्या अवतीभवती दिसून येते. आधुनिक भोंदूगिरी बोकाळत चाललेली दिसते. या आधुनिक भोंदूगिरीवर भाष्य करण्याचा सूक्ष्म प्रयत्न 'अवताराची गोष्ट' या चित्रपटाद्वारे केला आहे.
इथल्या प्रत्येक कलावंताने चित्रपटाला चार चाँद लागेल, असं परफॉर्मन्सचे नाणे खणखणीतपणे या चित्रपटात वाजवले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे, सुलभा देशपांडे, सुनील अभ्यंकर, लीना भागवत आणि रश्मी खेडेकर आपल्याला दिसतील, एका विशेष भूमिकेत प्रतिभावंत कलाकार आशिष विद्यार्थी आपल्याला झळकताना दिसेल. सिनेमाच्या शेवटी सगळ्यांना धूळ चारत हिरो जिंकतो असं बघायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. त्यामुळे सिनेमाच्या जगात हिरो हा नेहमीच मसिहा असतो. असाच आशय असणारा 'अवताराची गोष्ट' हा नवीन सिनेमा आहे.
या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा व संवादांची धुरा सांभाळलेली आहे नितीन दीक्षितने. निर्मितीची जबाबदारी सचिन साळुंखेने उचलली आहे. सिनेमॅटोग्राफी नागराज दिवाकर असून मयूर हरदासने संकलक म्हणून तर गंधारने संगीत दिले असून शान आणि जसराज यांच्या सुमधुर आवाजातील ही गाणी श्रवणीय झालेली आहेत.

मुळातले कथा-पटकथालेखक असलेले नितीन दीक्षित यांनी 'अवताराची गोष्ट' हा तयार केला असून नव्या, अस्फुट विषयालातो स्पर्श करणारा आहे, असे म्हणायला हरकत नाही.

या चित्रपटाला ५१ व्या राज्य मराठी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, संवाद व दिग्दर्शन अशा तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

रेटिंग : 3.5


यावर अधिक वाचा :

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला

'ड्रीम गर्ल' ने १०० कोटींचा गल्ला पार केला
बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना स्टारर 'ड्रीम गर्ल' चित्रपट चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस ...

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान

मराठी सिनेसृष्टीतील दहा रत्नांचा होणार सन्मान
कृष्णधवल चित्रपटांपासून ते आताच्या डिजिटल युगापर्यंतचे अनेक टप्पे यशस्वीरित्या पार करत आज ...

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘घोस्ट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विक्रम भट्ट हे हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘१९२०’ आणि ...

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे

यामी गौतमला तिच्या गावी जाऊन हे काम करायचे आहे
बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतमला आपल्या होम टाऊन अर्थात हिमाचल प्रदेशात जायचे आहे. यामी गौतम ...

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन

यंदाच्या 'एमी' पुरस्कारांसाठी भारतीय मालिकांना नामांकन
यंदाच्या इंटरनॅशनल एमी या पुरस्कारांची नामांकन यादी जाहिर करण्यात आली. यात नेटफ्लिक्सची ...

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ...

मराठी चित्रपट ‘बाबा’चे लॉस एंजलिस येथे ‘गोल्डन ग्लोब्ज’मध्ये प्रदर्शन
ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची अत्यंत नाजूक अशी कहाणी असलेल्या ‘बाबा’ या मराठी ...

जोकर: बॅटमॅनच्या नकारात्मक नायकाची कहाणी का ठरतेय

जोकर: बॅटमॅनच्या नकारात्मक नायकाची कहाणी का ठरतेय वादग्रस्त?
'जोकर' या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा होतेय. एरव्ही जोकर म्हटलं की रंगीबेरंगी पोशाख ...

कार्तिकने 'पति पत्नी और वो'चे पोस्टर शेअर केले, भूमीबद्दल ...

कार्तिकने 'पति पत्नी और वो'चे पोस्टर शेअर केले, भूमीबद्दल लिहिले- जरा हाई मेंटेनेन्स हैं हम
कार्तिक आर्यनचा आगामी चित्रपट 'पति पत्नी और वो'चा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. ...

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....

हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन जाईल पहा.....
पुणे- कोल्हापूर बसमध्ये दोघेजण. पहिला :- हे Whatsapp, facebook माणसाला खूप पुढं घेऊन ...

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप

अमीषा पटेलविरुद्ध अटक वॉरंट जारी, आर्थिक फसवणुकीचा आरोप
अभिनेत्री अमीषा पटेलविरुद्ध रांची हायकोर्टाने अटक वॉरंट जारी केला आहे. चित्रपट निर्माता ...