शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

येथे मर्जीनुसार नाही ठेवता येत मुलांची नावे

डेन्मार्क: येथील पालक आपल्या मुलांची नावे आपल्या मर्जीनुसार ठेवू शकतं नाही. डेन्मार्क सरकारने 24 हजार नावांची यादी जाहीर केलेली आहे. पालकांना यातूनच एक नाव निवडावं लागतं. आपल्याला एखादं नवीन नावं ठेवायचं असेल तर त्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागते.




पुढे वाचा विचित्र प्रतिबंधात असलेले काही देश...
 

मल‍ेशिया: 2011 पासून मलेशिया सरकारने येथे पिवळे कपडे घालू नये असा फर्मान जारी केला आहे. त्यांच्याप्रमाणे पिवळ्या रंगाचा वापर विरोधी कार्यकर्ते करतात. येथे पिवळ्या कपड्यांवरच नव्हे तर शू-लेस, टोपी, आणि इतर पिवळी अॅक्सेसरीज वापरण्यावरदेखील बंदी आहे.


सिंगापूर: येथील सरकारने 1992 पासून च्युइंगमच्या विक्रीवर बंदी लावली आहे. रस्ता, इमारती आणि इतर सार्वजनिक स्थळावर स्वच्छता ठेवण्यासाठी ही बंदी लावण्यात आली आहे. येथे खुल्यात च्युइंगम फेकण्यावर 500 डॉलरचा दंड आकारण्यात  येतो.


इराण: येथील सरकारने वेस्टर्न हेअर कट ठेवण्यावर बंदी घातली आहे. येथे सिंपल हेअर कट करू शकतो पण मुलेट्स, पोनीटेल्स आणि स्पाइक्स ठेवण्यावर मनाई आहे.


कॅनडा: येथे 2004 पासून मुलांच्या वॉकर चालवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. येथील झालेल्या एका संशोधनाप्रमाणे बेबी वॉकरमध्ये चालणार्‍या मुलांचा विकास हळू होतो. म्हणूनच ही सख्ती करण्यात आली असून अता येथील मुलं नैसर्गिक रूपाने चालायला शिकतात.