शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By

भारतातही लाल कानांचा हत्ती

सिमला- आशिया खंडातल लाल कांनाचे हत्ती लुप्त झालेल्या प्रजातींमध्ये मोडतात. मात्र, अलीकडेच उत्तराखंडच्या कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये असे लाल कानांचे हत्ती दिसून आले आहेत.
 
जयदीप राजपूत या व्यक्तीने अशा हत्तींची छायाचित्रे ही टिपली आहेत. नवी दिल्लीत बँक कर्मचारी असलेल्या राजपूत यांनी सांगितले की, नैसर्गिक कारणांमुळेच हत्तींचे कान असे लाल होत असतात. त्यामध्ये त्यांच्या निवार्‍याचे ठिकाण आणि वातावरणाचाही परिणाम असते. नॅशनल पार्कमध्ये आम्ही अनेकांनी असे लाल कानांचे हत्ती पाहिले. असा हत्ती दिसणे हे ही प्रजाती अस्तित्वात असल्याचा शुभसंकेतच आहे.
 
हे हत्ती अतिशय शांत होते आणि एखाद्या समजूतदार माणासासारखे वागत होते. आता या हत्तींचे जतन व संवर्धन याविषयी अधिक जागरूकतेने काम करण्याची गरज आहे.