शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Updated : गुरूवार, 7 मे 2015 (16:33 IST)

चाणक्य नीती

* मूर्ख शिष्यास उपदेश केल्याने आणि दृष्ट स्त्रीचे पोषण केल्याने तसेच दु:खितजनांच्या अतिसहवासाने विद्वानही दु:ख पावतो.

* जो अविनाशी वस्तू सोडून नाशिवंत वस्तूच्या पाठीस लागतो तो अविनाशी वस्तू सोडतोच पण नाशिवंत वस्तू नाश पावल्याने या दोन्ही वस्तूंना मुकतो.

* खाद्यपदार्थ असताना भोजनशक्ति असणे, स्त्री उपलब्ध असताना रतिशक्ति असणे, वैभव प्राप्त असताना दानशक्ति असणे, हे मोठे पुण्याचे फळ होय.

* मुलांचे अतिलाड करण्याने ती बिघडण्याची तर वेळीच योग्य शिक्षा करण्याने ती सद्गुणी बनण्याची शक्यता असते तरी शिक्षणाच्या बाबतीत पुत्राचे वा शिष्याचे लाड न करता त्यांना वेळीच ताडन करून सद्गुणी बनवावे.

* अत्यंत रूपवान असल्याने सीतेचे हरण झाले, संपत्ती- सामर्थ्यदिकांचा अतिगर्व झाल्याने रावणाचा नाश झाला, दानाचा अतिरेक केल्यामुळे बळीस पाताळांत जावे लागले या साठी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा.