बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: बुधवार, 6 मे 2015 (17:22 IST)

संस्कार

सकाळी झोपून उठल्यानंतर अंथरुणातच बसून तळहाताचे दर्शन घेता घेता देवाच्या स्मरणाने दिवसाची सुरुवात करावी. हाताला निरखून हे मंत्र म्हणावे.

कराग्रे वसते लक्ष्मी : करमुले सरस्वती ।
करमध्ये तु गोविन्द : प्रभाते करदर्शनम ॥


अर्थ
हाताच्या अग्रभागावर-बोटांवर लक्ष्मीचं वास्तव्य आहे. हाताच्या मूळभागावर अर्थात मनगटाजवळ सरस्वती तसेच मध्यभागे गोविन्दचे वास्तव्य आहे.

धार्मिक कारण
सकाळी करदर्शन केल्याने निरनिराळ्या देवांचे (लक्ष्मी, सरस्वती, गोविन्द) स्मरण केल्याने त्यांची प्राप्ती होते.

वैज्ञानिक कारण
सकाळी हाताचा रंग गुलाबी असेल तर सुदृढ, पांढरा असल्यास अँनिमिक अवस्था व सुरकुत्या असल्यास निर्जलीकरणाची समस्या, असे निष्कर्ष काढता येतात. याने तब्येत बिघडण्याच्या प्रथमावस्थेतच निदान केल्याने थोडक्या उपचारांत काम भागते.