गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Modified: सोमवार, 18 जानेवारी 2021 (16:24 IST)

कुंडली काय आहे

जन्म कुंडली ते चक्र आहे ज्याद्वारे जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती बद्दल माहिती मिळते. अर्थात जन्माच्या वेळी आकाशात ग्रहांची जी स्थिती असते कागदावर ती कुंडली म्हणून ओळखली जाते.
 
कुंडलीमध्ये बारा घरे असतात. या घरांना नावे दिलेली असतात. जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीची रास म्हणतात. 
 
राशींपैकी जी कोणती तरी एक राशी पूर्व क्षितिजावर असेल ती राशी म्हणजे लग्न होय. याला प्रथम भाव पण म्हणतात. जी राशी पूर्व क्षितिजावर असेल त्या राशीचा क्रमांक लग्न या घरात लिहितात. 
 
कुंडली तयार करण्यासाठी स्थानिक जन्मवेळ आणि स्थानाची अचूक माहीत असावी लागते. 
 
प्राचीन काळी नऊ ग्रहांना आधार मानले जात होते यापैकी आता सात ग्रह अस्तित्वात आहे. राहू आणि केतू ला छाया ग्रह मानले आहे. त्यांना गुरुत्व शक्तीने जोडून देखील बघितले जाते.