गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

नवग्रहासाठी वनस्पती मूळ

WD
ग्रह व नक्षत्र मानणारा मोठा वर्ग आहे. या ग्रह-नक्षत्रांचा अनुकूल व प्रतिकूल असा प्रभाव आपल्या जीवनावर पडत असतो. आपण घरात यज्ञ, जप, धार्मिक अनुष्ठान करतो व सुखाची अपेक्षा ठेवत असतो.

झाडा-झुडपाच्या कालचक्रात सूर्य-चंद्र तसेच नवग्रह यांचा अत्यंत जवळचा संबंध असल्याचे पुराणात सांगण्यात आले आहे. यज्ञात आहूती म्हणून अर्पण करण्यात येणारी सामग्री विविध प्रकारच्या जातीच्या वनस्पतींपासून मिळत असते. वनस्पतींवर समस्त प्राणीमात्रांचे जीवन अवलंबून आहे. जे नागरिक किंमती रत्‍न खरेदी करू शकत नाहीत तर ते झाडाची पाने किंवा मुळे यांचा वापर करू शकतात.

सूर्य ग्र
आपल्या कुंडलीत सूर्य कमजोर, कनिष्ठ किंवा अशुभ प्रभाव पाडणारा असेल तर बेल-पत्र लाल किंवा गुलाबी धाग्यात रविवारी धारण करावे. अशुभ प्रभाव कमी होईल.

चंद्र ग्र
चंद्र दूषित असून अशुभ प्रभाव पाडत असल्यास सोमवारी सकाळी खिरणीचे मूळ पांढर्‍या धाग्यात धारण करावे.

मंगळ ग्र
आपल्याला मंगळ असेल तर मंगळवारी दुपारी अनंत मूळ लाल धाग्यात धारण करावे.

बुध ग्र
बुध नकारात्मक प्रभाव टाकत असेल तर बुधवारी सकाळी विधाराचे मूळ हिरव्या धाग्यात धारण करावे.

गुरु ग्र
गुरु दोषी असून पीडा देणार असेल तसेच अशुभ प्रभाव टाकणारा असेल तर भारंगी किंवा केळ्याचे मूळ गुरुवारी दुपारी पिवळ्या धाग्यात धारण करावे.

शुक्र ग्र
आपल्याला केंद्राधिपती दोष असेल तर शुक्रवारी सकाळी सरपोरवाचे मूळ पांढर्‍या धाग्यात धारण करावे.

शनि ग्र
शनिची साडेसाती मागे लागली असेल तर शनिवारी सकाळच्या प्रहरी निळ्‍या धाग्यात बिच्छूची मूळे काळ्या धाग्यात धारण करावी.

राहु ग्र
राहूची अशुभता दूर करण्यासाठी पांढर्‍या चंदनाचा तुकडा निळ्या धाग्यात बुधवारी धारण केल्याने लाभ होतो.

केतु ग्र
केतुचा अशुभ प्रभाव कमी करण्‍यासाठी अश्वगंधाचे मूळ निळ्या धाग्यात गुरुवारी धारण करावे. त्यामुळे केतुचा अशुभ प्रभाव समाप्त होतो.