मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

प्रेमविवाहासाठी योग

परमेश्वराने दिलेली सगळ्यात मोठी देणगी म्हणजे प्रेम. ज्योतिषशास्त्रामध्ये असे अनेक योग व ग्रहदशा सांगितल्या आहेत ज्यांमुळे माणूस प्रेमात पडतो व प्रेमविवाह करतो. कारक ग्रहांसोबत अशुभ व क्रूर ग्रह असल्यास प्रेमविवाहात बाधा येते. पत्रिकेत प्रेमविवाहाचा योग नसेल तर प्रेमविवाह होत नाही किंवा सफल होत नाही.

पत्रिकेमध्ये मंगळाची राहू किंवा शनीबरोबर युती झाली तर प्रेमविवाहाची शक्यता असते.
 
राहू पहिल्या स्थानात म्हणजेच लग्न स्थानात असेल आणि सातव्या स्थानावर बुधाची दृष्टी असेल तर कुटुंबाच्या विरुद्ध 
जाऊन प्रेमविवाह करण्याकडे व्यक्तीचा कल दिसून येतो.
 
पाचव्या स्थानी राहू किंवा केतू विराजमान असतील तर प्रेमप्रकरणाचे विवाहात रूपांतर होऊ शकते.
 
जर राहू किंवा केतूची दृष्टी शुक्र किंवा सातव्या स्थानात पडली असेल तर प्रेमविवाहाची शक्यता सगळ्यात जास्त असते.
 
पाचव्या स्थानात या स्थानाच्या स्वामीसोबत चंद्र किंवा मंगळ विराजमान असतील तर प्रेमविवाह होऊ शकतो.
 
सातव्या स्थानाच्या स्वामीबरोबर मंगळ व चंद्र सातव्या स्थानात विराजमान असेल तर प्रेमविवाहाला अनुकूल वातावरण राहते.
 
पाचव्या व सातव्या स्थानाचे स्वामी किंवा सातव्या व नवव्या स्थानाचे स्वामी एकमेकांसोबत विराजमान झाले असतील तर प्रेमविवाहाचा योग येतो.
 
जेव्हा सातव्या स्थानातील स्वामी सातव्या स्थानातच असेल तरीही प्रेमविवाह होऊ शकतो.
 
शुक्र व चंद्र लग्नस्थानापासून पाचव्या किंवा सातव्या स्थानात असतील तर प्रेमविवाह करू शकता.
 
लग्न व पंचम स्थानाचे स्वामी किंवा लग्न व नवव्या स्थानाचे स्वामी एकत्र असतील किंवा एकमेकाला पाहू शकत असतील तर प्रेमविवाहाचा योग येऊ शकतो.
 
सातव्या स्थानात जर शनी किंवा केतू विराजमान असतील तर प्रेमविवाहाचा योग वाढतो.
 
जर सातव्या स्थानाच्या स्वामीची दृष्टी बाराव्या स्थानावर असेल किंवा सप्तमेशाची युती शुक्राबरोबर बाराव्या स्थानात असेल तर प्रेमविवाह संभवतो.