शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

भूताला पळवण्याचे सोपे उपाय

भूत- प्रेत खरंच अस्तित्वात आहे का? हा प्रश्न पडल्यावर त्यांना कसे ओळखावे आणि जर ते त्रास देत असतील तर त्यातून कसे सुटावे? या सर्व संबंधात माहीत देत आहे अखिल भारतीय षट्‍दर्शन आखाडा परिषद श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील प्रवक्ता व तंत्रशक्ति पीठाधीश्वर डॉ. बिन्दू जी महाराज. 
बिन्दू महाराज यांच्याप्रमाणे कित्येकदा निर्जन मार्गावर कोणी आवाज देत आहे पण दिसत नाही, असे वाटतं असल्यास हे प्रेत आत्मा असल्याचे चिन्ह आहे.
वाचा कसे ओळखाल भूत-प्रेत बाधित व्यक्तीला?

1. भूत लागलेल्या व्यक्तीची डोळे लाल आणि ताट असतील.
 
2. शरीरात दोन आत्मा असल्यामुळे असे व्यक्ती परस्परविरोधी क्रिया करतात. जसे एकाला कपडे घालायचे असतात तर दुसरी कपडे फाडते. एक जेवते तर दुसरी ताट फेकते. अर्थात अश्या लोकांमध्ये विनाश करण्याची प्रवृत्ती असते. 
 
3. भूत लागलेल्या व्यक्तीची ऊर्जा किंवा ताकद सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक असते.
4. दुर्लभ गोष्ट म्हणजे असे व्यक्ती कित्येकदा अशी भाषा बोलतात जी वास्तविक जीवनात समजणे शक्य नाही.
 
5. भूत पीडित व्यक्तीच्या चेहर्‍यावर नेहमी राग दिसून येतो.
 
बिन्दू महाराज म्हणतात की हा विकार चिकित्सकीय उपचाराने बरा होत नसून यासाठी तज्ज्ञांनी सल्ला आवश्यक आहे. तसेच मूर्ख लोकांच्या म्हणण्यात येऊन यावर उपचार करण्यापेक्षा काही सोपे उपाय करून ही बाधा टाळली जाऊ शकते.

वाचा सोपे उपाय

1. घरात सकाळ- संध्याकाळ लोबान आणि गुग्गलचा धूर करा.
 
2. ऊं नम: शिवाय किंवा आपल्या इष्ट देवाचा मंत्र उच्चारित करत पीडित व्यक्तीला सकाळ- संध्याकाळ गोमूत्राचे सेवन करवा.
3. पाच प्रकाराचे मिष्टान्न, पाच प्रकाराचे फळ रोगी व्यक्तीच्या स्थितीप्रमाणे 1, 3, 5, 7 किंवा 11 वेळा ओवाळून चौरस्त्यावर ठेवा.
 
4. संध्याकाळी चार वातींचा दिवा लावा आणि प्रेत आत्म्याला प्रार्थना करा आमच्याकडून किंवा पीडित व्यक्तीकडून काही चूक घडली असेल तर त्याला क्षमा करा आणि शरीरा सोडून जा.

पुढे वाचा आणखी काही सोपे उपाय

5. घरात गोमूत्र शिंपडा.
 
6. भूत पळवण्यासाठी पशू-पक्ष्यांची बळी देण्यासारखे मूर्खतापूर्ण कृत्य करणे टाळा. अशाने भूत पळत नसतात.
7. केवडा, केशर, चंदन, जाई, खस व इतर सुगंधित द्रव्य वापरा. याने आत्मा प्रसन्न होऊन निघून जाते.
 
8. सिद्ध मंदिर जसे मेहंदीपुर बालाजी इत्यादीचे दर्शन केल्यानेपण आत्मा शरीर सोडून निघून जाते.