गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By
Last Updated : सोमवार, 11 मे 2015 (17:23 IST)

मनाच्या शांतीसाठी मंगळवारी करा हे उपाय

मंगळवारचा दिवस हनुमंताचा दिवस मानला जातो. हा दिवस कर्जापासून मुक्तीसाठी सर्वात उत्तम आहे. काही असे सरळ उपाय आहे जे मंगळवारी केल्याने मनाला शांती मिळते आणि धनधान्यही लाभतं.
 
* या दिवशी सकाळी लाल गायीला पोळी देणे शुभ.

* मंगळवारी मारुतीच्या मंदिरात नारळ ठेवणे शुभ.

 

* मंगळवारी गणपतीला लाल वस्त्र, लाल फळं, लाल फुल आणि लाल रंगाची मिठाई अर्पण केल्याने मनोवांछित फळ मिळतं.

* मंगळवारी या वस्तूंचा उपयोग किंवा दान केल्याचे महत्त्व आहे: तांबा, केसर, कस्तूरी, गहू, लाल चंदन, लाल गुलाब, शेंदूर, मसुराची डाळ, लाल कण्हेर, लाल मिरची, लाल दगड, लाल मूंगा.

 


* मंगळवारी कोणत्याही देवीच्या मंदिरात ध्वजा चढवून आर्थिक समृद्धीची प्रार्थना करावी. पाच मंगळवार असे केल्याने धनप्राप्तीमध्ये होणारे अडथळे दूर होतात.

* मनाच्या शांतीसाठी एखाद्या मातीच्या भांड्यात गहूबरोबर पाच लाल फुल ठेवून त्या भांड्याला गच्चीच्या पूर्व दिशेच्या कोपर्‍यात झाकून ठेवावे. सात दिवस त्याला हात लावू नये. पुढील मंगळवारी सगळे गहू गच्चीवर पसरवून द्यावे आणि फुलांना देवाघरात ठेवावे. याने आपल्या जीवनातील सर्व तणाव दूर होतील आणि मनाला शांती मिळेल.