गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ग्रह-नक्षत्रे
Written By

यामुळे रुसून बसते लक्ष्मी

लक्ष्मी देवीची कृपा सतत आपल्यावर असावी, ही इच्छा सर्वांची असते. सर्व सुख-सुविधा हव्या असं वाटणारे सतत लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे मार्ग शोधत असतात. पण या कारणांमुळे काही लोकांवर देवी रुसून बसते:
 
1. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपणारे:
 
सूर्योदय आणि सूर्यास्तच्या वेळी झोपा कारणारे निश्चितच आळशी असतात. ही वेळ देव पूजेची असते. असे म्हणतात की या वेळेस देवी-देवता पृथ्वी भ्रमणासाठी निघतात आणि झोपणारा व्यक्तीवर ते रुसतात आणि अशाने दारिद्र्य येते.


 
* वैज्ञानिक कारण: सूर्योदयाच्या वेळी योग आणि व्यायाम करण्याने शरीर स्वस्थ राहतं. व्यायामासाठी ही वेळ सर्वोत्तम असते. संध्याकाळी झोपल्याने शरीर व मन सुस्त होतं. लठ्ठपणा तर वाढतोच आणि आरोग्यही बिघडतं. संध्याकाळी झोणणार्‍यांना बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, अपचन व इतर तक्रार असते.

2. दात खराब असणारे:
ज्या लोकांचे दात स्वच्छ नसतात त्यांच्यावरही लक्ष्मी प्रसन्न होत नाही.


 
* वैज्ञानिक कारण: याचा सरळ संबंध आपल्या आरोग्याशी आहे. जे लोकं आपले दातदेखील स्वच्छ करू शकतं नाही ते लोकं कोणतेही काम पूर्ण निष्ठा आणि प्रामाणिकपणे करण्यात समर्थ नसावे.   असे लोकं आळशी असून आपली जबाबदारी पार पाडत नाही. आरोग्याच्या दृष्टीने ज्यांचे दात स्वच्छ नसतात त्यांना पोटासंबंधी रोग असण्याची किंवा होण्याची शक्यताही असते.

3. गलिच्छ कपडे घालणारे:
पुराणांनुसार गलिच्छ, घाण, अस्वच्छ कपडे घालणार्‍या लोकांचा लक्ष्मी त्याग करते.


 
* वैज्ञानिक कारण: चांगले, स्वच्छ कपडे घातल्यावर आपला चांगल्या लोकांशी संपर्क वाढतो. नोकरी करण्यार्‍यांवर त्यांचा बॉस खूश होतो तर व्यवसाय करणार्‍यांच्या संपर्कातही चांगले लोकं येतात आणि नवीन संधी मिळते. तसेच गलिच्छ कपडे घातल्याने लोकं आपल्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. याने आपल्या व्यापार किंवा नोकरीवर विपरित परिणाम पडू शकतो.

4. अत्यंत ताव मारून जेवणारे:
जे लोकं आवश्यकतेपेक्षा जास्त जेवतात, अश्या लोकांवर ही लक्ष्मी प्रसन्न होत नसते.


 
* वैज्ञानिक कारण: आहारापेक्षा जास्त जेवणारे निश्चित लठ्ठ असतात. त्यांचा लठ्ठपणा त्यांना परिश्रमापासून लांब राहण्यासाठी बाध्य करतो. लठ्ठपणामुळे अनेक रोग त्यांना चिकटून असतात. हे लोकं परिश्रमापेक्षा भाग्यावर जास्त विश्वास करतात. पैसा नेहमी ‍परिश्रमाने पुढे वाढणार्‍यांना मिळतो, आळशी लोकांना नव्हे.

5. कठोर बोलणारे:
जे लोकं लहान- सहान गोष्टींवरून दुसर्‍यांवर चिढतात किंवा ओरडतात अश्या लोकांचाही लक्ष्मी त्याग करते.


 
* वैज्ञानिक कारण: जे लोकं आपल्या निष्ठुर स्वभावामुळे दुसर्‍यावर सतत ओरडत असतात आणि ज्यांच्या मनात दयाभाव नसतो ते आयुष्यात जास्ती पुढे जाऊच शकतं नाही. कारण अश्या लोकांना इतर लोकं नापसंत करतात. स्वभावाने प्रेमळ आणि दयावंत असणार्‍यांना पैसा आणि सन्मान दोन्ही मिळतं.