गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रह-नक्षत्रे
Written By वेबदुनिया|

रा, रि,रू, रे.... अंक्षरांचे व्‍यक्‍ती सुंदर आणि आकर्षक असतात!

WD
रा, रि,रू, रे, रो, ता, तू, ते या अक्षरांपासून सुरू होणा-या नावाचे लोक तूळ राशीचे असतात. या राशीचे चिन्‍ह तराजू असून ही राशी पश्चिम दिशेची द्योतक असते. ही वायूतत्‍वाची रास आहे. शुक्र या राशीचा स्‍वामी शनी आहे. या राशीच्‍या व्‍यक्‍तींची कफ प्रवृत्ती असते.

तूळ राशीचे मुले संस्‍कारी आणि आज्ञाधारक असतात. खेळात आणि कलेच्‍या क्षेत्राची त्‍यांना आवड असते. ही मुले घरात राहण्‍यास जास्‍त प्राधान्‍य देतात.

या राशीचे पुरूष सुंदर आणि आकर्षक व्‍यक्तिमत्‍वाचे धनी असतात. त्‍यांच्‍या डोळ्यांमध्‍ये चमक आणि चेह-यावर अनोखे तेज झळकत असते. त्‍यांचा स्‍वभाव स्थिर असतो. कोणत्‍याही परिस्थितीत ते विचलीत होत नाहीत. दुस-यांना प्रोत्‍साहन देणे, मदत करणे त्‍यांच्‍या स्‍वभावात असते. या व्‍यक्‍ती कलाकार, सौंदर्योपासक व प्रेमळ स्‍वभावाच्‍या असतात. मित्रांमध्‍ये ते लोकप्रिय असतात. काहीवेळेस ते व्‍यसनाधीन बनण्‍याची शक्‍यता देखील असते.

तूळ राशीच्‍या स्त्रिया मोहक व आकर्षक असतात. या स्त्रिया आनंदी आणि हसतमुख स्‍वभावाच्‍या असतात. बौद्धिक कामात त्‍यांना अधिक रस असतो. कला, गायन आणि घरकामात दक्ष असतात. छोटी मुले त्‍यांना खूप प्रिय असतात.

या व्‍यक्‍ती सौम्‍य आवाजाच्‍या असतात. यांचा चेहरा सतत हसरा असतो. ऐतिहासिक स्‍थळांना भेट देणे यांना आवडत असते. लग्‍नासाठी आणि व्‍यावसायिक कामासाठी तूळ राशीच्‍या व्‍यक्‍ती चांगल्‍या जोडीदार बनू शकतात. संगीत आणि प्रवासाची त्‍यांना आवड असते. मुलींना आत्‍मविश्‍वास असतो. गडद निळा आणि पांढरा रंग आवडीचा असतो. वाद-विवादात या व्‍यक्‍ती वेळ वाया घालवत नाही. तूळ राशीच्‍या व्‍यक्‍तींची मुले शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेरगावी जाण्‍याची शक्‍यता असते.