गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 जून 2016 (12:33 IST)

अतिगरम कॉफीमुळे कॅन्सरची शक्यता

तुम्ही कॉफीचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कॉफी प्यायल्याने कॅन्सरदेखील होऊ शकतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी 65 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त गरम असेल तर कॉपी कॅन्सरचं कारण बनू शकते, असं जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच थकज ने सांगितलं आहे. कोणतंही पेय 65 डिग्रीपेक्षा जास्त गरम असेल तर त्याने कॅन्सर होऊ शकतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. कॉफी ही आरोग्यास हानिकारक नाही, मात्र अधिक गरम असल्यास कॅन्सरची शक्यता असल्याचं समोर आलं आहे. कॅन्सरवर संशोधन करणारी आंतरराष्ट्रीय एजन्सी आयएआरसी या संस्थेनेदेखील कॉफी जास्त गरम असल्यास कॅन्सर होण्याच्या शक्यतेला दुजोरा दिला होता. चीन, इराण, तुर्की, दक्षिण अमेरिका या ठिकाणी हे संशोधन करण्यात आलं. या ठिकाणी कॉफी जवळपास 70 डिग्रीपर्यंत गरम केली जाते. त्यामुळे येथे कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते, असं आयएआरसीने सांगितलं.