शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Updated : बुधवार, 13 एप्रिल 2016 (16:19 IST)

दैनंदिन जीवनपध्दती अन् मधुमेह होण्याची शक्यता

– डाँ. रोशनी प्रदिप गाडगे, मधुमेहतज्ञ.
 
मधुमेह हा जीवनशैलीचा आजार म्हणून ओळखला जातो. बदललेली आहारपध्दती, कार्यशैली व वाढलेले वजन यामुळे मधुमेहाला आमंत्रण मिळते. मधुमेह हा अनुवांशिकतेनुसार होणारा आजार म्हणूनही ओळखला जायचा पंरतू अलिकडच्या काही अहवालात असे समोर आले आहे की हा आजार अनुवांशिकते व्यतिरिक्त इतरही कारणांमुळे होतो आहे. विशेष म्हणजे आई-वडीलांना हा आजार नसतानाही त्यांच्या मुलांना मधुमेह होण्याची अनेक उदाहरणे सध्या समोर येत आहेत आणि याचे एकमेव कारण म्हणजे चुकीची किंवा बदललेली जीवनशैली.. आणि म्हणूनच मधुमेह हा जीवनशैलीशी निगडीत आजार ओळखला जातो.
 
सुदृढ आरोग्यासाठी संतुलित आहार, सकाळी वेळेवर उठणे, व्यायाम किंवा कमीत कमी दिवसातून ४५ मिनिटे चालणे, एकाच जागी बैठ्या स्वरूपातील कामकाजप पध्दती असल्यास प्रत्येक तासाला थोडा वेळ फेरफटका मारून पायांची हालचाल करणे आवश्यक व शरीराच्या अवयवांची योग्य हालचाल केल्यास आरोग्य उत्तम राहू शकते व कोणत्याही प्रकारच्या आजारांना निमंत्रण मिळणार नाही, परंतू सद्याच्या धकाधकीच्या जीवनमानात प्रत्येकांचे दैनंदिन जीवनमान हे घडयाळ्याच्या काट्यानुसार चालते. विशेष म्हणजे कामाच्या वेळाप्रत्रकात होत असलेले बदल, शिफ्टपध्दती, मार्कटींग क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना कामानिमित्त सतत बाहेर फिरावे लागणे अशा अनेक कारणांमुळे बाहेरचे खाणे, व्यायाम, योगा, चालणे आदींसाठी वेळ न मिळणे व या सर्व घटकांमुळे मधुमेह, उच्चरक्तदाब, हदयविकार, घुडघ्याचें आजार, मणक्याचे आजार, लठ्ठपणा आदी आजारांना निमंत्रण मिळत असल्याचे समोर आले आहे. 
 
सध्या घरी बनवलेल्या नाश्त्यापेक्षा केलाँग्ज, फ्रुट ज्यूसेस, प्रक्रिया करून बनविलेले पदार्थ, छास, बादाम शेक आदी पदार्थ आरोग्यास घातक असल्याचे दिसून आले आहे व याच पदार्थांचा आपल्या नाश्त्यापासून ते जेवणामध्ये झालेले अतिक्रमण पहायला मिळतो. या पदार्थांमध्ये मिठ, तेल, मैद्याचा वापर असल्याने अति कँलरीज, फँट आदींमुळे काँलेस्ट्राँलचे शरीरातील वाढणारे प्रमाण धोकादायक आहे.
उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार व योग्य दिनक्रम आवश्यक 
बरेचदा वाढलेलं वजन घटविण्यासाठी रूग्ण नाश्ता किंवा दुपारचं जेवण न घेताच राहतात परंतू त्यामुळे वजन आटोक्यात येण्याऐवजी अधिक वाढू शकते, म्हणूनच सकाळच्या नाश्त्यांच योग्य प्रमाणात कँलरीज/ कार्बोहायड्रेट असलेलं पदार्थ नाश्त्यात असणे आवश्यक आहे.

व्यायाम –
सकाळी कमीत कमी ४५ मिनिटे चालणे आवश्यक, व्यायाम करत असल्यास २० मिनिटे कार्डियो व २० मिनिटे इतर शारीरिक व्यायाम केल्यास अधिक चांगले.

नाश्त्यासाठी – 
सकाळी ९ ते १० च्या सुमारास नाश्ता करणे आवश्यक. नाश्त्यामध्ये मोड आलेली कडधान्य, दुध, फळ, अंडी (पिवळे बळक काढून टाकावे), ड्रायफ्रुट, बादाम, आक्रोड यांचा समावेश असावा यामुळे प्रोटीन, कर्बोदके, फायबर मिळतात.
दुपार –सोबत घरचं जेवण घेतल्यास बाहेरच खाण टाळू शकता व आपले आरोग्य उत्तम सांभाळू शकता. सलाड, दही छास, पोळी भाजी या पदार्थांचा समावेश असावा.
सांयकाळी – ५-६ च्या आसपास चहा अथवा काँफी (शुगर फ्री) घेतल्यास योग व सोगब डायजेस्टीव्ह बिस्कीटे किंवा चना कुरमुरे, भेळ आदी पदार्थ खावू शकता 
रात्री – ९ च्या आसपास रात्रीचे जेवण घेण अपेक्षित व जेवल्यानंतर थोड चालल्यास पचन होण्यास मदत होईल.
उत्तम आहारासोबत तितकीच झोप घेणे आवश्यक आहे. ६-८ तास दिवसातून झोप घेणे आवश्यक आहे. विशेषता काँलसेंटर्स किंवा शिफ्टमधे काम करणा-यांनी याकडे लक्ष दिल्यास आरोग्याचे संतुलन बिघडणार नाही. तसेच प्रत्येक व्यक्तिने वयाच्या ३० वर्षानंतर दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे.