शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By

द्राक्षे खाऊन डोळ्यांचे आरोग्य ठेवा उत्तम

दररोज द्राक्षे खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम ठेवता येणार आहे. द्राक्षांचे रोज सेवन केल्याने डोळ्यांच्या पडद्यांचा र्‍हास होत नाही, असा दावा संशोधकांनी केला आहे.
 
अमेरिकेतील संशोधकांनी केलेल संशोधनानुसार द्राक्षे खाल्ल्याने रोजचा आहार समृद्ध होतो आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे डोळ्यांच्या पडद्यांची रचना आणि काम यांचे संरक्षण होऊ शकते. डोळ्यांचे पडद्यांमध्ये प्रकाशाला प्रतिसाद देणार्‍या पेशी असतात. त्यांना छायाचित्रे ग्रहण करणारी यंत्रणा असे म्हणतात.
 
या यंत्रणेचे प्रामुख्याने दोन विभाग असतात. डोळ्यांचे पडदे खराब झाल्याने छायाचित्रे ग्रहण करणार्‍या यंत्रणांमधील पेशी मरतात आणि आंधळेपणा येऊ शकतो. द्राक्षे खाल्ल्यामुळे या पेशींचे संरक्षण होऊ शकते का नाही, याबाबत मियामी विद्यापीठातील संशोधक आणि वास्मोक पाल्मर आय इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी संशोधन केले. त्यामध्ये त्यांनी उंदरांना दिवसातून तीन द्राक्षे दिली. यामधून असे निष्पन्न झाले की, उंदरांच डोळ्यांच्या पडद्याचे कार्य लक्षणीयरीत्य संरक्षित झाले. दुसर्‍या एका संशोधनात आणखी एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे, द्राक्षांच्या सेवनामुळे डोळ्यांच्या पडद्यामध्ये दाहक प्रथिनांची पातळी कमी होते आणि संरक्षण करणार्‍या प्रथिनांची संख्या लक्षणीयरीत्या वाढते. डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी द्राक्षे हे वेगवेगळ्या पद्धतीने ठरू शकते.