शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By वेबदुनिया|

मृत्यूची शिडी- धूम्रपान

धुम्रपान ही हल्ली फॅशन बनली आहे. अनुकरणातून लागलेली ही सवय अतिशय धोकादायक आहे. धूम्रपान केल्याने आजपर्यंत कोणाचेही भले झालेले नाही. भविष्यात होणार नाही. तंबाखूमध्ये एकही आरोग्यवर्धक गुण नाही. सिगारेट व विडी ओढण्याने ते व्यसन असणार्‍यांचेच आरोग्य खराब होते असे नाही तर जे लोक सिगारेट व विडीपासून दूर राहतात, त्यांनाही त्याचा त्रास जास्त होतो. धुम्रपान करणार्‍यापेक्षा त्याच्यासोबत राहणार्‍या व्यक्तीला त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. 

सिगारेट व विडीपासून निघणारा धूर प्रती वर्षी लाखो नागरिकांना मृत्यूच्या विळख्यात पाठवतो. कर्करागाने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा मृत्यू होतो तर काही हृदयविकार व दमा या आजाराने मरण पावतात. वयाच्या 25 व्या वर्षी तोंडातून धूर सोडणार्‍यांचे आयुष्य 10 वर्षांनी कमी होते. याचा अर्थ असा की, व्यक्तीचे आयुष्यमान जर 55 वर्षे असेल तर तो 45 वर्षेच जगतो.

धुम्रपान करणारी व्यक्ती हृदयरोग व मेंदूच्या आजाराने त्याच्या आयुष्यातील सुखद क्षण गमवून बसतो. व्यक्तीच्या आयुष्यातील 30 ते 40 वर्ष वयोमर्यादेचा काळ करीयर करण्याचा असतो मात्र, या उमेदीच्या काळात व्यक्ती अंथऱूणाला खिळलेला असतो. तंबाखूचा धूर व्यक्तीच्या हृदय व मेंदूच्या नसांवर हल्ला करतो. कमी वयातच घातक आजार त्याला जडतात व भविष्यात हे आजार वाढणारे असतात.

एंजियोप्लास्टी अथवा बायपास सर्जरी करूनही त्याचा काही एक फायदा होत नाही. एंजियोप्लास्टी किंवा बायपास केल्यानंतरही व्यसनावर नियंत्रण ठेवता आले नाही तर व्यक्तीसाठी मृत्यूची सर्व कवाडं खुली होतात.