शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2016 (11:07 IST)

4 तासांत 23 वेळा हार्ट अटॅक.. तरीही जिवंत!

आपल्या नातवाबरोबर क्रिकेट खेळत असताना कोचीनमध्ये राहणार्‍या अजित यांना अचानक छातीत दुखू लागलं. सलग चार तास हे दुखणं सुरूच होतं. परंतु, त्यांनी यावर फारसं लक्ष दिलं नाही. 
 
धूम्रपानाची सवय असणार्‍या अजित यांनी त्रास वाढल्यानंतर हॉस्पिटल गाठलं. इथं त्यांचा ईसीजी करण्यात आला तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आल्याचं समजलं. 
 
लगातार अटॅक आल्यानं त्यांच्या हृदयानं अनेकदा काम करणंही बंद केलं होतं. हे प्रकरण गंभीर होतं त्यामुळे डॉक्टरांनी अजित यांना तातडीनं मोठय़ा हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. चार तासांत 23 वेळा अजित यांना हार्ट अटॅक आला होता. 
 
स्टेन्टिंग करून डॉक्टरांनी अजित यांच्या हृदयाचे ब्लॉक हटवलेत. अजित यांची प्रकृती आता स्थिर आहे. डॉ. अनिल कुमार यांच्या म्हणण्यानुसार, आपल्या संपूर्ण मेडिकल करिअरमध्ये अशी घटना त्यांनी पहिल्यांदाच पाहिलीय.