शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2017 (12:50 IST)

झोप येत नाही, मग घ्या स्लीप ऍप्निया थेरपी, अवघ्या १० रुपयात उपचार

मुंबईतील कुपर रुग्णालयात  निद्रानाशावर रामबाण ठरणारी स्लीप ऍप्निया थेरपी सुरू करण्यात आली आहे. या थेरपीसाठी खास कूपर रुग्णालयात स्लीप रूम तयार केली आहे. या थेरपीमध्ये रुग्णाला 7-8 तास स्लिप रूम मध्ये झोपवलं जातं. त्याला मशीनद्वारे त्याच्या प्रत्येक गोष्टीचं चेक अप केलं जातं. यामध्ये ह्रदयाचे ठोके, श्वसन, फॅट या सगळ्या गोष्टींचं चेक-अप केल्यानंतर सॉफ्टवेअरचा उपयोग करून रुग्णाला नेमका कशामुळे निद्रानाशाचा त्रास होतो याचं निवारण केलं जातं. त्यानंतर त्याच्यावर औषध आणि इतर ट्रीटमेंट देऊन उपचार केले जातात. मुख्य करून स्थूलपणा, रात्री घोरणे , श्वसनाचा त्रास यामुळे निद्रानाशाचा त्रास रुग्णाला जाणवतो, असं डॉक्टरांच म्हणणं आहे. आता या अद्यावत आणि हायटेक थेरपीसाठी मोठी रक्कम तर मोजीव लागणार नाही ना, या प्रश्नानं तुमची झोप उडाली असेल. डॉक्टरांच्या माहितीनुसार या ट्रीटमेंटसाठी फक्त 10 रुपये मोजावे लागतात. एवढ्या स्वस्तात स्लीप ऍप्निया थेरपी मिळत असल्यामुळं रुग्ण देखील या सेवेचा मोठा लाभ घेत आहेत.