शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 मे 2015 (11:30 IST)

गर्भाशयातील बाळाच्या वाढीस मोबाइल रिंगमुळे धोका

सेलफोन वापरताना गर्भवती असलेल्या मातांनी काळजी घेण्याची गरज असून या फोनची रिंग वाजते तेव्हा गर्भाशयातील बाळाचे झोपेचे व उठण्याचे चक्र पार बिघडून जाते व नंतर त्याचे वाईट परिणाम होतात, असा धोक्याचा इशारा एका संशोधनात देण्यात आला आहे. 
 
साधारण 24 महिला डॉक्टर गरोदर असताना करण्यात आलेल्या प्रयोगानुसार सेलफोनची वारंवार वाजणारी रिंग व बीपचा आवाज याचा परिणाम गर्भावर काय होतो हे तपासण्यात आले. न्यूयॉर्क सिटी येथील वायकॉफ हाईट्स मेडिकल सेंटर येथे माता व गर्भवैद्यक विभागाचे संचालक बोरिस पेटिड्ढकोव्हस्की यांनी सांगितले की, मोबाइलचा गर्भातील बाळावर काय परिणाम होतो याचा अभ्यास करण्याचा आमचा हेतू होता. 
 
जर महिला गरोदर असेल व त्यांना सतत मोबाइल फोन येत असतील तर वाजणार्‍या रिंगमुळे गर्भाशयातील बाळास घातक त्रास होतो. त्याचे झोपण्याचे व जागण्याचे चक्रच बिघडून जाते. रिंगच्या केवळ आवाजामुळेच नाही तर स्पंदनांमुळेही त्याचे झोपेचे चक्र बिघडते. ज्या निवासी डॉक्टरांवर हे प्रयोग करण्यात आले त्यांच्यात तर खूप वाईट परिणाम दिसले. काहींचे वेळेआधीच बाळंतपण झाले तर काहींचा रक्तदाबाचा त्रास वाढला, काही मुलांचे वजन जन्मत: कमी निघाले. असे असले तरी मोबाइलच्या आवाजामुळेच हे सगळे परिणाम होत असावेत याची अजून खातरजमा करण्यात आली नाही.