Marathi Biodata Maker

थकवा दूर करा असा…

दिवसभर काम, काम आणि फक्‍त काम करणारे अनेक जण असतात. त्या कामापुढे मग त्यांना कशाचेही भान नसते. याचा परिणाम त्यांच्या केवळ जीवनशैलीवरच होत नाही तर आरोग्यावरही होतो. विशेष म्हणजे सततचे काम आणि दररोजचे ताण देणारे काम यामुळे एकप्रकारे थकवा येतो. हा थकवा दूर करण्यासाठी मग नाना प्रकारे प्रयत्न केले जातात. असेच काही योग्य रीत्या केलेले उपाय आणि प्रयत्न थकवा दूर करू शकतात. असे काही उपाय –
 
सकाळी झोपेतून उठल्यावर थकवा जाणवत असेल आणि कोणतेही काम करायची इच्छा होत नसेल तर त्यासाठी आपण मनातून काही गोष्टी करणे आवश्‍यक आहे.
 
सर्वप्रथम तुम्ही भरपूर झोप घ्या. अपुरी झोप झाल्यामुळे चिडचीड होते तसेच शरीरात आळस निर्माण होतो.
 
पाण्यात थोडेसे मीठ टाकून आंघोळ केल्याने रक्‍तपुरवठा सुधारतो आणि शरीराला आराम मिळतो. असे केल्याने ताजेतवाने वाटते.
 
शॉवरखाली आंघोळ करायला आवडत असेल तर त्याखाली उभे राहून थोडा वेळ थंड पाणी अंगावर टाकावे.
 
जेवणावर तुमच्या शरीराची शक्‍ती केंद्रित असते. व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्‍त जेवणाने ताकद वाढते. म्हणून जेवणात अन्न, फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवावे. चॉकलेट, मांस, अल्कोहोल व कॅफीनयुक्‍त पदार्थ खाणे टाळावे.
 
व्यायामामुळे रक्‍तात एंड्राफिन्सचे प्रमाण वाढते. त्यामुळे मन प्रसन्न होते. म्हणून मोकळ्या जागेत नियमित व्यायाम करण्याची सवय लावावी. ताजी हवा व मोकळ्या वातावरणामुळे थकवा दूर होतो.
 
शरीराला मॉलिश केल्यानेसुद्धा आळस दूर होतो.
 
थकवा दूर करण्यासाठी तणावमुक्‍त राहणे गरजेचे आहे. तणावामुळे शरीराची ऊर्जा संपते व थकवा येतो. हा व्यायाम करून पहा : दीर्घ श्‍वास घ्या. काही सेकंदापर्यंत श्‍वास रोखून ठेवा व नंतर सोडून द्या. काही मिनिटे असेच करा.
 
शक्‍य झाल्यास एका जागी बसून एखादा प्राणायाम केल्यास त्याचा नक्‍कीच फायदा होईल.
 
रंगांचासुद्धा जीवनावर प्रभाव पडतो. नारंगी, लाल, पिवळा आणि डार्क हिरवा रंग मनाला तजेला देतात. त्यामुळे प्रसन्न वाटते.
 
साभार : डॉ. राजेंद्र माने 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

Dhaba Style अमृतसरी छोले भटुरे रेसिपी

फर्टिलिटी ट्रीटमेंट घेत आहात? जास्त व्यायाम करणे ठरू शकते हानिकारक जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

HR क्षेत्रात करिअर करायचे आहे? MHRM कोर्सची संपूर्ण माहिती जाणून घ्या

नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी महागड्या फेशियलचा त्रास टाळा! हे घरगुती उपाय करा

उन्हाळ्यात स्विमिंगपूल मध्ये पोहायला जाण्यापूर्वी डोळ्यांची काळजी घेण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

पुढील लेख
Show comments