शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By

Try This : आरोग्य सल्ला

अतिरिक्त कॅलरी कमी करण्यासाठी दररोज धुने, स्वच्छता यासारखी कामे केल्यास निश्चितपणे फायदा होतो. अतिरिक्त कॅलरी नियंत्रणात ठेवणे आपल्याच हाती आहे. छोटी मोठी कामे केल्यास हे सहज साध्य होते. तंदुरूस्तीही वाढते.  
 
अंजीरातून शरीराला लोह, व्हिटॅमिन्स ए. बी. सी बऱ्याच प्रमाणात मिळते. तसेच शर्करा भरपूर प्रमाणात मिळते. अंजीर खायला थंड व पचायला जड असतात. यांच्या सेवनाने गॅससेची तक्रार दूर होते. तसेच पित्त विकार, रक्तविकार, व वात विकार यातील औषधी गुणधर्मामुळे दूर होतात.
 
जीर्णावर लिंबू फार उपयुक्त आहे. ते आडवे कापून त्यावर सुंठ किंवा सैंधव (मीठ) घालून निखाऱ्यावर गरम करावे आणि वारंवार चोखावे. त्यामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे त्रास कमी होतो.
 
अधिक उपवास केल्यास शारीरिक व्याधी उत्पन्न होतात. यामुळे गॅसेस, अल्सर, डोकेदुखी उद्भऊ शकते. याशिवाय रक्ताची कमी भरून निघते.
 
अधूनमधून काकवी व तूप खाल्ल्यास हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते. यामध्ये लोह अधिक असते. शरीरातील लोहाचे प्रमाण कायम राखण्यासाठी ताजे सफरचंद नियमित सेवन केल्यास फायदा होतो. दररोज एक सफरचंद.
 
अध्यात्म व धर्मासाठी वेळ काढा, मन प्रसन्न राहील, स्वत:साठी देखील वेळ काढा, त्यात आपणास आवडणारे काम करा. दररोजचे नियमित कामे, व्यवसाय, नोकरी हे तर करावेच लागते, मात्र यामधूनही दररोज थोडा वेळ काढा.
 
आपल्या आवडीचे जेवन घ्या, मात्र चरबीयुक्त जेवनाचे सेवन कमी प्रमाणात करा. आपण दररोज दोन अंडी घेत असल्यास एक घ्या. मासाहारही आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर उगाच शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. 
 
आपल्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी टेनिस, क्रिकेट, फूटबॉल यासारखे खेळ खेळण्यास चांगला परिणाम जाणवतो. यामुळे चरबी कमी होते. तंदुरूस्त राहण्यासाठी आवश्यक आहार घेणे तर आवश्यक आहेच.
 
आरोग्याच्या जोपासनेसाठी दररोज आवश्यक व्यायाम, चांगला पोषक आहार घेणे आवश्यक आहे. यासाठी आहारात फळे, ताज्या भाज्या, अंडी, मास, मासे, यांचा समावेश करावा. सोबतच दूध, दूधाचे पदार्थांचाही समावेश असावा. 
 
आवळा चुर्ण व आवळ्याचे पदार्थ त्वचेतील शुष्कता कमी करतात. आवळा हा आर्युवेदात महत्त्वपूर्ण ओषधी गुण असलेला मानण्यात येतो. आवळ्याच्या नियिमित सेवनाने तारूण्य टिकून राहते, चेहर्‍यावर तेज येते.