शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By वेबदुनिया|

गुणसूत्रांसाठी धूम्रपान घातक

बदलत्या राहणीमानामुळे धुम्रपानाला आता फॅशनचे वलय आले असले तरीसुद्धा नव्या संशोधनातून आता सिगारेटचे भीषण तोटे जगासमोर येऊ लागले आहेत. सिगारेटमुळे केवळ व्यक्तीच्या बाह्य आरोग्यावरच दुष्परिणाम होतात असे नाही तर त्यामुळे व्यक्तीच्या गुणसूत्रावरदेखील विपरीत परिणाम होत असल्याचे संशधनातून स्पष्ट झाले आहे. 

सिगारेटच्या धुरामुळे पुरुषांमधील अकाली वृद्धत्वाचा आजार बळावतो. तसेच त्यामुळे वीर्याची गुणवत्तादेखील घसरते, असे नव्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

वडील जर जास्तप्रमाणात धूम्रपान करत असतील तर त्याचा जन्माला येणार्‍या बाळावरदेखील विपरीत परिणाम होतो. यामुळे बालकाची स्मृती तर कमी होतेच, पण त्याचबरोबर त्याच्य गुणसूत्रांवरदेखील याचा दूरगामी परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे. ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रॅडफोर्डच्या स्कूल ऑफ लाईफ सायन्स या संशोधन संस्‍थेतील वैज्ञानिकांनी हे संशोधन केले आहे. वडिलांचे अतिधूम्रपान जन्माला येणार्‍या बाळाला ल्युकेमिया आणि अन्य मानसिक आजार देऊ शकते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

अतिधूम्रपानामुळे पुरुषांच्या शरीरातील वीर्याची गुणवत्ता कमी होत असल्याने अपत्य प्राप्तीमध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. निरोगी कामजीवनासाठी धूम्रपान सोडाच असा मोलाचा सल्ला संशोधकांनी दिला आहे.