शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. आरोग्य
  4. »
  5. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 जून 2014 (17:44 IST)

प्रकृतिसापेक्ष आहारामुळे वजनात घट

वाढलेले वजन ही अनेकांसाठी मोठी समस्या असते. वाढलेल्या वजनामुळे अनेक गंभीर आजार निर्माण होत असतात. मात्र, वजन घटवण्यासाठी अनेक उपाय केल्यानंतरही यश येत नाही आणि अपेक्षित परिणाम साध्य न झाल्यामुळे समस्या वाढतच जाते. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या शरीरातील चयापचय क्रियेनुसार गुणसूत्रावर आधारित आहार घेतल्यास वजन घटवण्याची क्रिया अधिक परिणामकारक होऊ शकते, असे संशोधकांच लक्षात आले आहे. साध उपांनी जितके वजन घटते त्यापेक्षा तिप्पट घट या नव्या उपाने करता येऊ शकेल, असे इटलीमधील ट्रिस्ट या संस्थेमधील संशोधकांचे म्हणणे आहे.

या संस्थेने प्रमाणाबाहेर वजन वाढलेल्या 200 लोकांचे दोन गट करून त्यांच्यावर वजन कमी करण्यासाठी केल्या जाणार्‍या उपायांबाबत संशोधन केले. दोन्ही गटांसाठी एक विशेष आदर्श आहार निश्चित करण्यात आला. दोन्ही गटांचे डीएनए तपासण्यात आले व त्याद्वारे पचनक्रियेशी संबंधित शरीरातील विविध अवयवांवर परिणाम करणारी व चवींना आणि आहाराला प्राधान्य देणारी गुणसूत्रे निश्चित करण्यात आली. त्यानुसार या गटांच आहारात फेरफार करण्यात आले. ज्या गटातील लोकांच्या शरीरातील मेद सहजपणे कमी होत नव्हता त्या गटातील लोकांना त्यांच्या आहारातील उष्मांकात बदल न करता कमी मेदुयुक्त आहार देण्यात आला. सुमारे दोन वर्षांच्या कालावधीत तर सहा महिन्यांनी त्यांची तपासणी करण्यात आली. दोन्ही गटांमध्ये अशा प्रकारच्या आहारामुळे वजनात घट होत असल्याचे निष्पन्न झाले. मात्र ज्या गटाचा आहार त्यांच्या गुणसूत्रांच्या आधारे निश्चित करण्यात आला होता. त्यांच्या वजनात इतरांच्या तुलनेत तीन पटीने घट झाल्याचे लक्षात आले. त्यामुळेच केवळ उष्मांक नियंत्रित करण्याच्या नेहमीच पद्धतीऐवजी व्यक्तीच्या शरीरातील गुणसूत्रांवर आधारित आहार घेतल्यास त्याचा अधिक चांगला परिणाम होत असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी लवला आहे.