मंगळवार, 19 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By

कोबीचे 5 चमत्कारिक फायदे

स्वादिष्ट व्यंजन तयार करण्यासाठी कोबी वापरली जाते पण ही आरोग्यासाठी खूप फायद्याची आहे. अंगदुखी असो वा जखम, थायरॉईड असो वा स्तनांच्या समस्या, कोबीचे उपाय जादूप्रमाणे परिणाम देतात. तर पाहू कोबी बांधण्याचे फायदे:

1 सूज-  हात, पाय किंवा शरीरातील कोणत्याही भागात जखम झाल्यामुळे दुखणे आणि सूज असल्यास झोपताना कोबीचे पान घेऊन त्याजागी ठेवावे आणि वरून पट्टी बांधून घ्यावी.  आराम मिळेल.

2. स्तन वेदना- नवजाताला दूध पाजताना काही महिलांना स्तनात वेदना जाणवते. अशात कोबीचे पान स्तनावर ठेवल्याने दुखणे दूर होईल.

3. थायरॉईड- थायरॉईड ग्रंथी शरीरातील मेटाबॉलिझम नियंत्रित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. याव्यतिरिक्त ही पचन क्रियेसाठीही महत्त्वाची आहे. यासंबंधित समस्या असल्यास गळ्यावर थायरॉइड ग्रंथी असलेल्या ठिकाणी कोबीचे पान ठेवा वरून शाल गुंडाळून घ्या. सकाळी हटवून द्या.

4. डोकेदुखी- आपल्याला डोकेदुखीमुळे असह्य वेदना होत असतील तर यामागे डोळ्यांची कमजोरी किंवा अधिक ताण आणि थकवा हे कारण असू शकतं. ताज्या कोबीचे एक पान घेऊन डोक्यावर आणि कपाळावर ठेवा. नंतर डोके झाकून घ्या. दुखणे कमी होईल.

5. शरीरातील कोणत्याही भागाला हीलिंग पॉवर देण्यासाठी हा सर्वोत्तम उपाय आहे. दुखणे दूर करण्यासाठी हे लोहचुंबक सारखे कार्य करते.