शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By भाषा|

पंडित नेहरूंनी फडकावलेला ध्वज गायब

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंर 1947 मध्ये पहिले पंतप्रधान डॉ. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फडकावलेला ध्वज गायब आहे. कुणलाच त्याच्याविषयी काहीही माहिती नाही.

14 ऑगस्ट 1947 ला मध्यरात्री नेहरूंनी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तिरंगा फडकावला. लॉर्ड माऊंटबॅटन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावर्षी स्वातंत्र्याचा हिरकमहोत्सव साजरा होत आहे पण नेहरूंनी पहिल्यांदा फडकावलेले ते तीन ध्वज कुठे आहेत, याची कुणालाही माहिती नाही. राष्ट्रीय संग्रहालय, लाल किल्ला संग्रहालय, राष्ट्रीय अभिलेखागार, नेहरू मेमोरियल, राष्ट्रपती भवन संग्रहालय यापैकी कुठल्याही ठिकाणी हे ध्वज नाहीत.

स्वातंत्र्याची साठ वर्षे आणि 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामाची दीडशे वर्षे साजरी करत असलेल्या सांस्कृतिक खात्यालाही ध्वज कुठे आहेत ते माहिती नाहीत. या खात्याच्या मंत्री अंबिका सोनी यांनी सांगितले, की स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम संरक्षम मंत्रालयातर्फे साजरा केला जातो. त्यांनाच याबाबची माहिती मिळवायला पाहिजे. त्यांना ध्वज मिळाल्यास आम्ही ते आमच्याकडे ठेवू.

संसदेच्या संग्रहालयाचे व्यवस्थापक फ्रॅंक ख्रिस्तोफऱ यांनी सांगितले, की आमच्याकडे संसदेशी संबंधित काही स्मृतीचिन्हे आहेत. पण 14 ऑगस्टच्या मध्यरात्री फडकावलेला ध्वज नाही. तो सापडल्यास आम्हाला तो आमच्या संग्रहालयात ठेवायला आवडेल. लोकसभेचे सरचिटणीस पी. डी. टी. आचार्य यांनीही या ध्वजाचा पत्ता सांगण्यात असमर्थता दर्शवली.