1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
  4. Moral Story The story of the lion and the giraffe

नैतिक कथा : सिंह आणि जिराफची गोष्ट

Kids story : अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक जिराफ राहत होता. तो जंगलातील सर्वात उंच प्राणी होता. त्याची मान इतकी लांब होती की तो उंच झाडांची पाने खाऊ शकत होता. त्याला आपल्या उंचीचा आणि लांब मानेचा खूप अभिमान होता. जेव्हा जेव्हा तो मैदानावर चरणाऱ्या प्राण्यांना पाहत असे, तेव्हा तो त्यांची चेष्टा करून हसत असे.

तसेच एके दिवशी, तीन जंगली म्हशी अन्नाच्या शोधात जंगलातून भटकत होत्या. भटकता भटकता त्या अशा ठिकाणी आल्या, जिथे एक जिराफ उंच झाडाची पाने खात होता. त्यांनाही ती पाने खायची होती, पण त्या जिराफाइतक्या उंच नव्हत्या आणि त्यांची मानही लांब नव्हती. म्हणून त्या जिराफाकडे गेल्या आणि म्हणाल्या, "जिराफ दादाआम्हालाही थोडी पाने दे. आम्हालाही त्यांची चव घेऊ दे."

गर्विष्ठ जिराफाने त्यांना रागावून म्हटले, "जर तुम्हाला झाडाची पाने खायची असतील, तर ती स्वतःच तोडा. मी तुमचा नोकर नाही की ती झाडावरून तोडून तुम्हाला खाऊ घालावी."

जिराफाच्या शब्दांनी म्हशींना खूप वाईट वाटले. त्या जिराफाला म्हणाल्या, "आम्ही फक्त तुला विनंती करत होतो. जंगलातील प्राण्यांनी एकत्र राहावे आणि एकमेकांना मदत करावी."

"तुमचे शहाणपणाचे प्रदर्शन करू नकोस! तुम्ही इथून निघून जा," जिराफ रागाने म्हणाला आणि पाने खाऊ लागला.

आता मात्र त्या तीन रानम्हशी खाली गवत चरू लागल्या. तेवढ्यातच, एक सिंह अचानक तिथे आला. तो दिवसभर भुकेला होता आणि मोठ्या शिकारीच्या शोधात होता. जेव्हा त्याने जिराफाला पाहिले, तेव्हा तो विचार करू लागला, "आज मी या जिराफाची शिकार करीन आणि मनसोक्त त्याचे मांस खाईन."

तो जिराफाच्या दिशेने जाऊ लागला. जवळच चरणाऱ्या रानम्हशींनी सिंहाला पाहताच, त्या पळून एका गुहेत लपल्या. पाने खात असलेला जिराफचे सिंहाकडे लक्ष न्हवते.
जेव्हा सिंह जिराफाजवळ आला आणि मोठ्याने गर्जना केली, तेव्हा जिराफाने त्याच्याकडे पाहिले. तो प्रचंड घाबरला होता. तो मदतीसाठी ओरडू लागला. जवळच्या गुहेत लपलेल्या जंगली म्हशींनी त्याचा आवाज ऐकला.

एक म्हैस म्हणाली, "हा गर्विष्ठ जिराफ असाच असायला हवा."
दुसरी म्हैस म्हणाली, "अगदी बरोबर! त्याने आम्हाला खायला पाने दिली नाहीत."
त्यांचे ऐकून तिसरी म्हैस म्हणाली, "नाही! आपण त्याला मदत केलीच पाहिजे. आपण सर्व एकत्र राहिलो तरच कोणत्याही मोठ्या संकटाचा सामना करू शकू."

त्या दोन म्हशींना तिसऱ्या म्हशीचा मुद्दा समजला. त्यांनी जिराफाला मदत करायचे ठरवले आणि त्या गुहेतून बाहेर पडून सिंहाच्या दिशेने निघाल्या. सिंहाजवळ पोहोचल्यावर त्यांनी त्याला आव्हान दिले, "जर तुझ्यात हिम्मत असेल, तर आम्हा तिघांचा सामना कर." समोर तीन शक्तिशाली जंगली म्हशींना पाहून सिंह घाबरला आणि पळून गेला. जिराफाचे प्राण वाचले. त्याचा गर्व मात्र भंगला. त्याला आपल्या वागणुकीबद्दल पश्चात्ताप झाला आणि त्याने म्हशींची माफी मागितली. म्हशींनी त्याला माफ केले. त्या दिवसापासून त्या सर्वजणी एकोप्याने राहू लागल्या.
तात्पर्य : कधी गर्विष्ठ होऊ नका. नेहमी एकोप्याने राहा.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... आणखी वाचा
पुढील लेख
Eyebrow Lamination भुवयांना परफेक्ट आणि ग्लॉसी लुक देणारा नवा ट्रेंड आयब्रो लॅमिनेशन, सुरक्षित आहे का?