नैतिक कथा : चिमणी, गरुड आणि सापाची गोष्ट
एका घनदाट जंगलात चिमणीचे एक कुटूंब राहत होते. ते एका पिंपळाच्या झाडावर राहत होते. त्या झाडाखाली एक सापही राहत होता. साप नेहमीच अन्नाच्या शोधात असायचा, पण चिमणी कधीही आपल्या पिलांना एकटे सोडत नव्हती.
चिमणा अन्न घेण्यासाठी बाहेर पडली तेव्हा चिमणी नेहमीच आपल्या पिलांची काळजी घेत असे. एके दिवशी, सापाने झाडावर चढण्याचा निर्णय घेतला. तो चढत असताना, चिमणा आणि चिमणीने त्याला पाहिले. दोघांनीही त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु सापाने त्यांना खाली पाडले ज्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. त्यांनी सर्व अशा सोडून दिली व एकमेकांना म्हणू लागले की, आता आपले पिल्ले वाचणार नाही हा दुष्ट साप त्यांना काहून टाकणार. व चिमणा आणि चिमणीने आपले प्राण सोडले. पण अचानक दूरच्या झाडावर बसलेला एक गरुड बराच काळ त्यांच्या शौर्याचे निरीक्षण करत होता. जेव्हा त्याने चिमणा आणि चिमणीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले, तेव्हा गरुडाने आपल्या मजबूत नखांनी सापाला पकडले आणि नदीत टाकले आणि चिमणीच्या पिलांना वाचवले. गरुडाने चिमणीच्या पिलांची जबाबदारी घेतली आणि त्यांना आनंदाने वाढवले.
तात्पर्य : नेहमीच धैर्याने संकटांना तोंड दिले पाहिजे.
Edited By- Dhanashri Naik