मुल्ला नसरुद्दीन कहाणी वासाची किंमत

kids story
Last Modified बुधवार, 31 मार्च 2021 (08:47 IST)
बऱ्याच वर्षांपूर्वी एक भिकारी नंदनगरात भुकेने व्याकुळ झालेल्या अवस्थेत लोकांकडून खाण्यासाठी भिक्षा मागत होता. एक माणूस त्याला खाण्यासाठी काही भाकरी देतो. भाकरी साठी भाजीचा शोध घेत तो एका खानावळी जवळ जातो आणि भाकरी साठी भाजी मागतो. तो दुकानदार त्याला हाकलवून लागतो. तो खूप दुखावतो आणि लपून त्या खानावळीच्या स्वयंपाकघराच्या खिडकीशी जाऊन उभा राहतो. त्या खिडकी जवळ भाजीचे गरम गरम मोठे मोठे पातेले ठेवलेले असतात. तो विचार करतो की जर या भाकरी ला भाजीच्या वाफेवर ठेवले तर या भाकरींमध्ये भाजीची चव येऊ लागेल आणि मग भाकरी खाता येईल. असं विचार करून तो भाजीच्या येणाऱ्या वाफेवर भाकरी ठेवतो. तेवढ्यात त्या खानावळीचा मालक तिथे येतो आणि त्याला असं करताना बघतो. तो त्याला भाजीची चोरी केली म्हणून धरतो. तो भिकारी त्याला मी फक्त भाजीची वाफ घेतली भाजी घेतली नाही असे स्पष्ट पणे सांगतो तरी ही तो मालक त्याला म्हणतो की जरी तू भाजी घेतली नाही तरी ही त्याचा वास घेतला आहे तुला त्याचे पैसे द्यावे लागतील.

तो भिकारी त्याला घाबरत म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावर तो मालक त्याला धरून मुल्ला नसरुद्दीन कडे नेतो आणि घडलेले सर्व सांगतो.
मुल्ला नसरुद्दीन सर्व काही शांतपणे ऐकतात आणि मालकाला म्हणतात की तुला तुझ्या भाजीच्या वासाचे पैसे पाहिजे? मालक म्हणतो हो मला माझ्या भाजीच्या वासाचे पैसे पाहिजे.
मुल्ला नसरुद्दीन म्हणतात की मी स्वता तुला त्याचे पैसे देणार "असं ऐकल्यावर मालक खुश झाला. मुल्ला नसरुद्दीन म्हणाले की मी नाण्याच्या आवाजाने आपल्याला देणार. असं म्हणत त्यांनी आपल्या खिशातून नाण्याची पिशवी काढतात आणि परत ठेवतात. हे बघून मालक त्यांना म्हणतो की आपण ही कशी काय किंमत दिली आहे. मुल्ला नसरुद्दीन म्हणतात ज्या प्रमाणे तुझ्या भाजीची वास भिकाऱ्याने घेतली आहे त्याच प्रमाणे मी देखील तुला नाण्याचा आवाज ऐकवून भाजीच्या वासाची किंमत मोजली आहे. जर भिकाऱ्याने काही भाजी घेतली असती तर तुला काही नाणे दिले गेले असते. मुल्ला नसरुद्दीन चे म्हणणे ऐकून मालक मान खाली घालून तिथून निघून जातो. भिकारी देखील मुल्ला नसरुद्दीन चे आभार मानून आपल्या वाटेला निघून जातो.

शिकवण- बुद्धिमत्ता आणि हुशारीने प्रत्येक समस्या सोडविली जाऊ शकते. जसे की मुल्ला नसरुद्दीन ने मालकाशी केले.



यावर अधिक वाचा :

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

आता थेट बोगस डॉक्टरचा पर्दाफाश
पुण्याच्या शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे एका बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी ...

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला

खासदार संजय राऊत यांनी ममता दीदींना पाठिंबा दर्शवला
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल ...

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल

लॉकडाऊनची अंमलबजावणी दोन दिवसांनी होईल
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासठी 12 ते 13 दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे, ...

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख

लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता : अस्लम शेख
राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, ...

PNB महिलांना मोफत प्रशिक्षण देत आहे, दरमहा लाखो कमावू शकता, कोण अर्ज करू शकेल?
पंजाब नॅशनल बँक महिला सक्षमीकरणासाठी अनेक सुविधा पुरवते. पुन्हा एकदा पीएनबीच्या मदतीने ...

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी

उन्हाळ्यात घ्या लहानग्यांची काळजी
*उष्णतेुळे अंगावर घामोळे येणे, उष्णतेमुळे अंग जळजळणे, हिट रॅशेस यासारख्या कारणांनी मुले ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ...

MPPSC recruitment 2021 मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात मेडिकल ऑफिसरच्या 727 पदांवर भरतीसाठी अर्ज करा
मध्‍यप्रदेश लोक सेवा आयोग (एमपीपीएससी) ने मेडिकल ऑफिसर (MO) च्या 727 पदांवर भरतीसाठी ...

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय
सैंधव मीठ रॉक सॉल्‍ट किंवा सैंधव मीठ यात क्लींजिंग गुण असतात ज्याने घामाचा वास नाहीसा ...

श्रीखंड खाण्याचे फायदे

श्रीखंड खाण्याचे फायदे
श्रीखंड दह्याने तयार केलं जातं. यात आढळणारे घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. हे प्रो-बायोटिक ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त ...

कोव्हिड-19 साथीच्या आजारात घरी करा हे 3 योगासन, तंदुरुस्त राहा
कोव्हिड-19 कोरोना व्हायरसच्या या काळात घरी राहणे सर्वात सुरक्षित आहे. अनेक लोक वर्क फ्रॉम ...