शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शनिवार, 23 जानेवारी 2021 (12:58 IST)

फॉयल पेपर वापरत असाल नक्की वाचा, आरोग्यासाठी धोका

प्रवाससाठी जात असो वा पिकनिकसाठी, अनेकदा जेवण तयार करुन आम्ही ते एल्युमिनियम फॉयल पेपरमध्ये रॅप करुन घेतो. अनेकदा काही खाद्य पदार्थ उरले असल्यास फॉयलमध्य रॅप करुन ते फ्रीजमध्ये ठेवून देतो पण आपल्याला माहित आहे का हे आपल्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे ते-
 
एक शोधात आढळून आले आहे की याने आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. कारण जेव्हा आम्ही गरम जेवण यात पॅक करतो तेव्हा फॉयल पेपर विरघळू लागत आणि ते आपल्या खाद्य पदार्थात मिसळून जातं. याने अनेक आजरांचा धोका वाढतो-
 
अल्जाइमर
याने मेमरी लॉस, निर्णय न घेता येणे, बोलण्यात समस्या असे त्रास होऊ शकतात. याने डिमेंशिया आणि हाडं कमजोर होण्यासारखे आजार देखील होऊ शकतात.
 
किडनी
याने लिव्हर आणि किडनी फेलियरचा धोका देखील वाढतो.
 
कर्करोग
एल्युमिनियमचे घटक पदार्थांत मिसळ्याने कर्करोगासारखे आजार उद्भवू शकतात.
 
फॉयलऐवजी हे वापरा
फॉयल पेपरऐवजी आपण कंटेनर वापरु शकता. ज्यात जेवण गरम राहत असेल. किंवा आपण चांगल्या क्वालिटीचे काचेचे भांडे देखील वापरु शकता ज्याने आरोग्याला धोका होण्याची शक्यता नसते.