शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 12 जानेवारी 2022 (22:46 IST)

किचनच्या कपाटातून येणाऱ्या वासातून सुटका करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

स्वयंपाकघरातील बहुतेक वस्तू जुन्या असतात, जेव्हा कपटाचा विचार केला जातो तेव्हा बऱ्याच वर्षांपासून ते बदलले जात नाही. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. कधी कधी कपाटातून वास येऊ लागतो. अशा परिस्थितीत, कपाटाला दररोज स्वच्छ करणे खूप कठीण आहे आणि असे करताना त्याचा वास खूप वाढतो. या वासाची अनेक कारणे असू शकतात. तेलाच्या वासामुळे लाकूड फुगाल्याने वास येतो, अनेकवेळा ओली भांडी किंवा स्वयंपाकघरातील ओले कपडे ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागते. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे कपाटाला  वास येऊ लागतो. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. 
 
1 बेकिंग सोडाचा वापर -काही वेळा कपाट साफ केल्यानंतरही छोट्याशा चुकीमुळे दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत बेकिंग सोडा कपाटात ठेवा आणि कपाट व्यवस्थित बंद करा. बेकिंग सोडा रात्रभर कपाटात राहिल्यास तो वास शोषून घेतो आणि आणि वासाची समस्या दूर होते.  
 
2 पाण्यापासून वाचवा -बर्‍याच वेळा भांडी साफ केल्यानंतर लोकं ओली भांडी कपाटात ठेवतात, त्यामुळे कपाटात झुरळही येतात. असे करत असाल तर विसरूनही ही अशी चूक करू नका. भांडी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कोरडे झाल्यानंतरच साठवा. दुसरीकडे, जर तुम्ही कपाट पाण्याने स्वच्छ करत असाल तर साफ केल्यानंतर ते उघडे ठेवा.
 
3 व्हिनेगर वापरा -जर कपाटाला खूप घाण वास येत असेल तर  व्हिनेगर वापरू शकता. यासाठी आपण  एका स्वच्छ कपड्यात व्हिनेगर घेऊन कपाट नीट पुसून घ्या आणि नंतर काही वेळ उघडे राहू द्या. 
 
4 फ्रेशनर उपयुक्त आहे- जसे फ्रेशनरचा वापर खोलीला सुगंधित करण्यासाठी केला जातो. त्याच प्रकारे, स्वयंपाकघरातील कपाट सुगंधित करण्यासाठी आपण आवश्यक असेन्शियल ऑयलची  मदत घेऊ शकता.  जेव्हा स्वयंपाकघरातील कपाट पूर्णपणे स्वच्छ असेल तेव्हाच हे उपयुक्त ठरेल. यासाठी असेन्शिअल ऑइल मध्ये  कापसाचा बोळा बुडवा आणि नंतर स्वयंपाकघरातील कपाटात ठेवा. तुम्ही ते रात्रभर ठेवू शकता आणि सकाळी बाहेर काढू शकता.