शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

फेकू नका लिंबाचे साल, पाहा किती उपयोगी आहे...

लिंबाचे साल जोड्यावर घासून काही वेळे उन्हात ठेवून द्या. याने जोड्यांमध्ये चमक येईल.
 
‍फ्रीजमध्ये लिंबाचे साल ठेवल्याने इतर वास दूर होते. हे इतर पदार्थांची वास दूर करण्यास मदत करतं.
लिंबाचे साल दातावर घासल्याने पिवळेपणा दूर होतो.
 
जिथे मुंग्या होत असतील तिथे लिंबाचे साल घासल्याने मुंग्या पळतात.

लिंबाच्या सालावर बेकिंग सोडा टाकून हे हाताच्या कोपर वर घासावे. काळपटपणा दूर होतो.
 
लिंबाचे साले कापून त्यात दूध, ऑलिव्ह आयल आणि लिंबाचा रस मिसळून पायाच्या टाचा स्वच्छ करा.
लिंबाच्या बियांमध्ये सेलिसिक अॅसिड असतं. हे सीमित मात्रेत खाल्ल्याने वेदनांपासून मुक्ती मिळते. 
 
कपड्यावरील डाग मिटवण्यासाठी लिंबाचे साल त्यावर घासून रात्रभर तसेच राहू द्या. सकाळी डाग स्वच्छ होऊन जातील.