गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By

भेसळ ओळखण्याच्या 10 सोप्या टिप्स, जाणून घ्या...

हल्ली प्रत्येक गोष्टीत भेसळ होत असल्यास लोकांना खाणे-पिणे अवघड झाले आहेत. कधी दुधात पाण्याची तर मसाल्यात रंगाची भेसळ. हे सर्व आरोग्यावर वाईट परिणाम टाकतं. यापासून वाचण्यासाठी आम्ही येथे सांगत आहोत काही सोप्या टिप्स:
1 तिखट: तिखटात विटांची बारीक पावडर मिसळी जाते ज्यात कृत्रिम रंगदेखील मिसळलेला असतो.
चाचणी: तिखटात पाणी टाकून ठेवा. तिखट वरील बाजूला आल्यास शुद्ध तर खाली बुडाले तर भेसळयुक्त आहे.
 
2 हळद: हळदीत मेटानिल येलो नावाचे रसायन मिसळतात ज्याने कर्करोग होण्याचा धोका असतो. 
चाचणी: हळदीत काही थेंब हाइड्रोक्लोरिक ऍसिड आणि तेवढेच थेंब पाण्याचे टाकून पाहा. जर हळदीचा रंग गुलाबी किंवा जांभळा झाला तर समजून जा की भेसळ झाली आहे.
 

3 दालचिनी: दालचिनीमध्ये पेरूच्या झाडाची साले मिसळण्यात येते.
चाचणी: दालचिनी हातावर रगडून पाहा. जर याचा रंग दिसला छान आहे नाही तर भेसळयुक्त.
4 काळी मिरी: पपईच्या बियांना काळा रंग देऊन यात भेसळ केली जाते. अशाने याचे वजन वाढतं.
चाचणी: काळी मिरी पाणी किंवा दारूत टाका. जर वर राहिली तर अशुद्ध आणि बुडून गेली तर शुद्ध आहे.

5 हिरवे मटार: हिरवे मटार अजून हिरवेगार दिसायला हवे म्हणून यात मेलाकाइट ग्रीन मिसळले जातं. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.
चाचणी: मटाराचे दाणे काही वेळासाठी पाण्यात सोडून ठेवा. पाणी हिरवं झाल्यास समजून जा यात भेसळ झाली आहे.

6  मोहरी: मोहर्‍यांनमध्ये अर्जेमोनेच्या बिया टाकून त्याचे वजन वाढवले जाते. 
चाचणी: मोहरी दाबून पाहिल्यावर पिवळा पदार्थ निघतो आणि अर्जेमोनेच्या बिया दाबल्यावर पांढरा.

7 खवा: दुधासह खव्यातही भेसळ होते.
चाचणी: खवा टेस्‍ट ट्यूबमध्ये भरून त्यात 20 एमएल पाणी टाकून उकळवा. गार झाल्यावर यात दोन थेंब आयोडीन टाका. जर खवा निळा पडला तर समजा यात स्टार्च मिसळलेला आहे.
8 दूध: दुधात पाणी मिसळणे अगदी सामान्य आहे.
चाचणी: गुळगुळीत फरशीवर दुधाचे काही थेंब टाका. जर थेंब चिन्ह न सोडता त्वरित पुढे वाहिले तर यात पाणी मिसळलेले आहे. जर दूध शुद्ध असेल तर ते हळू हळू वाहिलं आणि पांढरे डाग सोडेल.

9 तांदूळ: तांदुळात प्लास्ट‍िक किंवा बटाट्याने निर्मित केलेले अशुद्ध तांदुळाची भेसळ झाली असते. हे पचण्यासाठी कठिण असल्यामुळे पोटासंबंधी रोग होऊ शकतात.
चाचणी: शिजताना लक्ष द्या. यातून वेगळ्याच प्रकाराची गंध येते.
10  सफरचंद: तसे तर सर्व फलांमध्ये भेसळ होत असते पण सफरचंद खाण्यापूर्वी चाचणी करा. त्यावर मेणाची परत चढवण्यात येते. ज्यानेकरून सफरचंद चमकदार दिसतं.
चाचणी: चाकूद्वारे ओरखडून बघितल्यावर आपण हे सोपेरित्या पाहू शकता.