शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. लव्ह टीप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जून 2021 (20:21 IST)

Father's Day 2021 विशेष:या तीन गोष्टी लक्षात ठेवा ,वडिलांशी नातं दृढ होईल.

जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा वडील आपल्या मुलांची काळजी घेतात .तर मुलांची देखील जबाबदारी आहे की मुलांनी मोठे झाल्यावर आपल्या वडिलांचा सांभाळ देखील व्यवस्थित करावा.त्यांच्या तब्बेतीची काळजी घेतली पाहिजे.परंतु आजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या आयुष्यात आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की आपले आपल्या वडिलांकडे दुर्लक्ष दिले जाते.त्यामुळे मुलाचे आणि वडिलांचं नातं दुरावले जाते. असं होऊ नये वडील आणि मुलाचं नातं नेहमी घट्ट व्हावे यासाठी स्वतःमध्ये बदल आणणे आवश्यक आहे तसेच ,या 3 गोष्टींची काळजी घ्या जेणे  करून मुलं आणि वडिलांचे नाते घट्ट होतील.
 
1 वडिलांसह असा वेळ घालवा- आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्तं असलेल्या दिनचर्येत आपण थोडा वेळ काढून आपल्या वडिलांसह घालवा. त्यांच्या सह वॉक ला जा. याचे दोन फायदे आहे एकतर आपल्याला वडिलांसह बोलायची संधी मिळेल आणि वॉक केल्याने आपली तब्बेत देखील सुधारेल.आणि आपल्या दोघातील नातं दृढ होईल.
 
2 वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या- मुलं लहान असताना वडील आपल्या मुलांची काळजी घेतात.तर मुलांचे देखील हे कर्तव्य आहे की त्यांनी देखील मोठे झाल्यावर आपल्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे .वडिलांना काही आजार आहे तर त्यांच्या औषधाची काळजी घ्या. त्यांना चेकअप साठी वेळच्यावेळी डॉक्टर कडे तपासणीला न्या.असं केल्याने आपल्या वडिलांना असं वाटेल की आपले मुलं आपली खूप काळजी घेत आहेत.या मुळे त्यांना छान वाटेल आणि त्यांच्या आरोग्यात सुधारणा होईल.
 
3 वडिलांच्या भावनांना जपा-आपल्या वडिलांशी मुळीच वाद  करू नका ,आणि काही वाद असतील तर लवकरात लवकर ते दूर करा.मुलांची सवय असते की रागाच्या भरात आपल्या वडिलांना काहीपण बोलतात.ज्यामुळे वडिलांच्या भावना दुखावतात,म्हणून त्यांच्याशी बोलताना नम्रतेने बोला .त्यांच्याशी आवाज मोठा करून बोलू नका.कारण या मुळे आपले संबंध दुरावू शकतात.