गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 16 मे 2016 (12:28 IST)

आई हरवलेली आहे

आई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे
मुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे
आधुनिक युगाच्या धावपळीत, सिनेमा, फॅशनच्या जमान्यात, कॉम्पुटर, लॅपटॉप, टीव्ही, स्मार्टफोन, इंटरनेटच्या जगात  
आई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे
मुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे
मुलांनी आजच्या जगात कसे वागावे, कसे बोलावे, काय ऐकावे, काय पाहावे, काय खावे, काय प्यावे हेच ती त्यांना सांगायला विसरली आहे 
आई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे
मुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे
महिलांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे खरी पण त्यांना आपल्या मातृत्वाची विसर पडली आहे
ज्या जिजाऊ मातेने रामकृष्ण, भक्त प्रल्हाद, कर्ण, अर्जुन यांच्या गोष्टी सांगुन शिवबा राजे व संभाजी राजे घडवले अशा मातेची त्यांना विसर पडलेली आहे.
आई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे
मुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे
समाजात आज जे स्त्रीवर अत्याचार चाललेले आहेत ते ती मुकाट पणे का सहन करते आहे
तिला भवानी मातेची, कालीका मातेची, झाशीच्या राणीची, हिरकणीची, अहिल्याबाई होळकर यांची तसेच सावित्रीबाई फुले यांची विसर पडली आहे.
आई हरवलेली आहे ........ आई हरवलेली आहे
मुलांवर संस्कार करायला विसरलेली आहे
आता उठा, जागे व्हा आणि  आपल्या मातृत्वाला जागे करा व आपल्या मुलांमध्ये रामकृष्ण, कर्ण, अर्जुन, शिवबा आणि संभाजीराजे घडवा.
आपल्या मुलांवर संस्कार करा........ आपल्या मुलांवर संस्कार करा 
 
-अमोल यशवंतराव सुर्वे