शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

व्यक्ति विशेष : शिवाजी सावंत

WD
‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे झाला. संपूर्ण महाभारताचा वेध घेणारी आणि आजच्या वाचकाला थेट कुरूक्षेत्रावर नेणारी ‘मृत्यूंजय’ ही कादंबरी त्यांनी अवघ्या सत्ताविसाव्या वर्षी लिहिली. कर्णाच्या या कथानकाने लोकप्रितेचे सारे बंध ओलांडले. त्या कथेची हिंदी, इंग्रजी, मल्याळम, कन्नड, गुजराथी, बंगाली, तेलुगू, उडिया या भाषांत भाषांतरे झाली. अशी स्थल, काल, भाषेच्या मर्यादा ओलांडून गेलेली ही मराठीतील पहिली कादंबरी! तिला राज्य शासनाच्या पुरस्कारापासून मूर्तिदेवी पुरस्कारापर्यंत अनेक पुरस्कार लाभले. त्यानंतर शिवाजीरावांनी लिहिलेल शंभू चरित्राची, ‘छावा’चीही पुरस्कारांनी अशीच पाठराखण केली. पद्मश्री विखे- पाटलांची चरित कहाणी, ‘लढत’,मनोहर कोतवालांचा ‘संघर्ष’, क्रांतिसिंहांची ‘गावरान बोली’, ‘शेलका साज’,‘मोरावळा’,‘अशी मने असे नमुने’, ही त्यांची अन्य ग्रंथसंपदा. मराठी मनावर गारूड करून राहिलेल्या शिवाजीरावांच्या भाषेची मोहिनी आजही अबाधित आहे. ‘युगंधर’ ही श्रीकृष्णावरची त्यांची नवी कादंबरी. या ‘मृत्युंजकारां’चा आज जन्मदिन.