मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : गुरूवार, 21 एप्रिल 2022 (13:15 IST)

घामाचा दुर्गंध दूर करतील हे 5 घरगुती उपाय

sweat
सैंधव मीठ
रॉक सॉल्‍ट किंवा सैंधव मीठ यात क्लींजिंग गुण असतात ज्याने घामाचा वास नाहीसा होतो तसंच त्वचेवरील सूक्ष्मजंतूंवर देखील प्रभावी ठरतं. कोमट पाण्यात सैंधव मीठाचे काही खडे टाकून मिसळून वापरु शकता.
 
टोमॅटो रस
टोमॅटो आपल्या व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडेंट विशेषतेमुळे प्रसिद्ध आहे, ज्याने अतिरिक्त घाम थांबण्यास मदत होते. सोबतच त्वचेवरुन बॅक्टेरिया नाहीसं करण्यात मदत होते. टोमॅटोच्या रसात कपडा बुडवून प्रभावित अंगांवर लावा. याने अती घाम येणार नाही.
 
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा एल्कलाइन असतं ज्याने शरीराची दुर्गंध कमी करण्यासाठी  बॅक्टेरियाद्वारे फुटणार्‍टा घामाचं अॅसिड संतुलित करतं. घामाचा वास दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि पाण्याची पेस्ट तयार करा. हे आर्म्समध्ये लावा आणि वाळल्यावर धुऊन टाका ज्याने आर्द्रतेची पातळी कमी होते.
 
ग्रीन टी बॅग्स
अॅटीऑक्सीडेंट आणि डिटॉक्सिफाइंग गुणांनी भरपूर ग्रीन टी बॅग घामामुळे शरीरातून येणारा वास दूर करण्यासाठी वरदान आहे. केवळ गरम पाण्यात काही टी बॅग बुडवाव्या आणि एकदा भिजल्यावर अंडरआर्म्स तसंच जेथे अधिक प्रमाणात घाम येत असेल तेथे 5 मिनिटासाठी दाबून ठेवा नंतर जागा धुऊन घ्या. 
 
अॅप्पल व्हिनेगर
अॅप्पल व्हिनेगरमुळे दुर्गंध निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. कॉटन बॉल्सला अॅप्पल साइडर व्हिनेगरमध्ये बुडवून सर्व घाम येत असलेल्या जागांवर लावायचे आहे. वाळल्यावर गार पाण्याने धुऊन घ्या.