बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

मासिकधर्मात होत असेल त्रास तर...

काही आजार असे असतात की ते इतकी अंगवळणी पडतात की माणूस त्यांना जीवनाचा भाग समजू लागतो, त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यातलाच एक त्रास म्हणजे स्त्रियांना मासिकधर्माच्या आधी होणारा मानसिक व शारीरिक त्रास.


 
पीएमएस अर्थात प्री मेन्शरेशन सिंड्रोम. ही समस्या लाखो स्त्रियांना असते. ही समस्या फार कॉमन असल्यामुळे याला कधीच आजार जाहीर केले गेले नाही. ही एकाप्रकाराची शारीरिक-मानसिक स्थिती आहे, जी स्त्रियांना मासिकधर्माच्या आठ ते दहा दिवस आधीपासून जाणावयाला लागते. प्रत्येक स्त्रीला काहीतरी त्रास होतोच. कोणाला मानसिक तर कोणाला शारीरिक पातळीवर किंवा काही जाणीना दोन्ही पातळ्यांवर.
 

मानसिक त्रास
* चिडचिडेपणा: यात साधारण कारणावर ही स्त्रिया चिडायला लागतात. कोणावरही आपला राग काढतात. अश्या काळात मुलांना मारण्याचे प्रमाण वाढते. 



भावनाप्रधान: या काळात काही स्त्रिया लहान-सहान गोष्टींमुळे दुखावल्या जातात. कधी त्या इतक्या हळव्या होतात की रडायला लागतात. 

निराश: काही स्त्रियांना या काळात काही करायला सुचतंच नाही. त्यांना घबराहट, कळमळ जाणवते किंवा रूटीन कामाचा कंटाळ येतो. कशात ही चित्त लागत नाही.

शारीरिक त्रास
या काळात शरीरावर किंवा ब्रेस्टवर सूज येते. वक्ष दाबल्यावर दुखतात. वजन वाढतं. डोकेदुखी, अंगदुखी जाणवतं.
 
काही स्त्रियांचा चेहर्‍यावरची मुरुमे वाढतात.


 
बर्‍याच स्त्रियांना पोट फुगणे आणि मंदसे दुखणे यासारखा त्रास भोगावा लागतो.
 
या काळात काही स्त्रियांना भुकेत बदल जाणवतो. कोणाला गोड तर कोणाला तिखट पदार्थ खावेसे वाटतात.

या काळात विशेष काळजी घेण्याची गरज भासते. स्त्रियांनी या काळात ही काळजी घ्यावी.
 
* पुरेशी विश्रांती
संतुलित आहार



उत्तेजक पेये, अल्कोहोल ह्यांचे सेवन कमी करावे
कुटुंबीयाशी त्रासाबद्दल चर्चा करून त्यांना विश्वासात घ्यावं
धूम्रपान करू नये
ज्या स्त्रियांना मानसिक किंवा शारीरिक लक्षणांचा त्रास जास्त होतो त्यांनी डॉक्टरांशी संपर्क करावा
प्रत्येक महिन्यात त्रासाचा प्रकार बदलत नाही. त्यात सातत्य असते. जर प्रत्येक पाळीच्या अगोदर एक ठराविक त्रास होत नसून त्यात बदल होत असेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा.