शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By वेबदुनिया|

स्वयंपाकघरात गॅस वापरताना..

* गॅस व सिलिंडर नेहमी उघडय़ा जागी ठेवावा. कपाटय़ासारख्या बंदिस्त जागी ठेवू नये.

* गॅस सिलिंडरच्या बाजूला वर्तमानपत्राची रद्दी, जुने कपडे, प्लॅस्टिकच्या पिशव्या ठेवू नयेत.

* गॅस सिलिंडरच्या बाजूला रॉकेल, पेट्रोलसारखे ज्वालाग्राही पदार्थाचे डबे ठेवू नयेत.

* गॅस सिलिंडरच्या बाजूला ओलसरपणा, दमटपणा किंवा जास्त उष्णता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यवी.

* गॅस सिलिंडर जेव्हा वापरात नसेल तेंव्हा त्याची सेफ्टी कॅप त्यावर लावून ठेवावी.

* सिलिंडर ठेवण्यासाठी चाकाच्या ट्रॉलीज वापरू नयेत.

* गॅसचा रेग्युलेटर व्यवस्थित बसला आहे की, नाही हे पाहण्यासाठी त्यावर साबणाचे पाणी टाकून बुडबुडे येतात का पाहावे.

* गॅसपुरवठा करणारी रबरी नळी आयएसओचा शिक्का असलेली घ्यावी. दर्जाहिन नळी घेऊ ने.

* गॅसपुरवठा करणार्‍या नळीची लांबी दीड मीटरपेक्षा जास्त नसावी.

* गॅसपुरवठा करणार्‍या नळीला कोठे चिरा पडल्या नाहीत ना ते वरचेवर पहावे.

* गॅसपुरवठा करणार्‍या नळीवर उकळते पाणी किंवा गरम तेल पडणार नाही याची काळजी घ्यावी.

* गॅसची शेगडी घेतानाही आयएसओचा शिक्का पाहूनच खरेदी करावी.

* गॅसची शेगडी सिलिंडरपेक्षा उंचावर असावी.

* गॅसची शेगडी जमिनीपासून कमीत कमी दोन फुटावर आसावी.

* गॅसच्या शेगडी खिडकीजवळ ठवू नये.

* गॅस शेगडी मागच्या ¨भतींवर कपाटे असून नयेत.

* गॅसच्या शेगडीचा बर्नर पितळी असावा, लोखंडी बर्नर गंजल्याने आतील छिद्रे बुजतात.

* क्रोमियम प्लेटिंगपेक्षा स्टेनलेस्टिलची शेगडी जास्त काळ टिकते. अशाच शेगडीची निवड करा.

* स्वयंपाक करण्याची पूर्वतयारी व्यवस्थित करून मगच शेगडी पेटवावी. अगोदर शेगडी पेटवून ठेवू ने.

* गॅसवरील पदार्थाला उकळी आल्यावर गॅस बारीक करावा.

* गॅस शेगडीवर अन्न शिजवताना लहान बर्नरवर लहान भांडे व मोठय़ा बर्नरवर मोठे भांडे ठेवावे.

* स्वयंपाकासाठी सपाट बुडाची भांडी वापरल्यास गॅसची बचत होते.


मृदुला फडके