गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

रुपयाची ऐतिहासिक घसरण

WD
ुपयाची घसरण बुधवारी मुक्तपणे चालूच होती. डॉलरच तुलनेत पहिलंदाच 64.54 या नीचांकी पातळीर्पत घसरण झाल्यानंतर दिवसअखेरीस थोडीशी सुधारणा होऊन रुपया प्रति डॉलर 64.11 झाला. मंगळवारच्या भावामध्ये 86 पैशांची घसरण झाली.

बँक आणि गुंतवणूकदारांनी डॉलरची मागणी मोठ्या प्रमाणात केल्यामुळे ही घसरण झाली. मंगळवारी रुपयाचा भाव प्रति डॉलर 63.25 होता. बुधवारी बाजार सुरू होताना रुपया 63.45 वर सुरू झाला व दुपारपर्यंत आणखी घसरला. रिझर्व्ह बँकेने रुपयाची घसरण थांबविण्यासाठी मंगळवारी काही उपायोजना केल्या आहेत. आठ हजार कोटींचे बाँड खरेदी करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला असून उत्पादन क्षेत्राला पुरेसा पतपुरवठा होण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत.

दुपारच्या सत्रामध्ये मुंबई शेअर निर्देशांक 400 अंशाने घसरला होता.

आणखी घसरणार?

नवी दिल्ली, दि. 21- रुपयाच्या किमतीत आणखी मोठी घसरण होणार असून, येत्या महिन्याभराच्या कालावधीत प्रतिडॉलर 70 रुपये एवढे अवमूल्यन होण्याची शक्यता डॉइश बँकेने वर्तवली आहे. या वर्षाच्या अखेरीपर्यंत रुपया पूर्ववत होण्याची अपेक्षा असतानाही ही घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

* पाच दिवसात रुपाची 292 पैसे घसरण

* सेन्सेक्सची 340 अंशाने घसरण, वर्षभरातील नीचांक

* मुंबईत सोने 75 रुपाने महाग- 31,440

* रिझर्व्ह बँकेच आणखी उपयांची शक्यत