मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. शेअर बाजार
Written By वेबदुनिया|

रुपयाचे अवमूल्यन, सेंन्सेक्स नाराज

WD
रिझर्व्ह बँकेने रुपयाचे अवमूल्यन थांबवण्यासाठी घेतलेल्या उपाययोजनांचा थेट परिणाम शेअरबाजारावर दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया मंगळवारी ५९.२० च्या स्तरावर उघडला. सोमवारच्या तुलनेत ६९ पैशांची वाढ झाली. मात्र रुपयात सतत होत असलेल्या अवमूल्यनाची नाराजी शेअर बाजाराने व्यक्त केली आहे.

दिवसाच्या सुरुवातीलाच शेअरबाजारात ३३१ अंशांची घसरण होऊन निर्देशांक १९७०३ च्या स्तरावर खुला झाला. तर निफ्टीमध्येही १०७ अंशांची घट झाली असून ५९२५ अंशांवर दिवसाची सुरुवात झाली. बँक आणि रियल्टी कंपन्यांच्या शेअर्स दणक्यात घसरल्यामुळे बाजारात दबाव दिसून येत आहे. या दोन्ही इंडेक्समध्ये चार टक्क्यांची घट झाली. तर कॅपिटल गुड्स इंडेक्समध्ये तीन टक्के, मेटल, पीएसयू, ऑटो, उर्जा, तेल आणि नैसर्गिक वायूच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव दिसून आला.