शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By

व्हॅनिला आइसक्रीम

साहित्य: अर्धा लीटर दूध, 2 अंडी, 6 चमचा साखर, अर्धा चमचा जिलेटिन, 2 चमचे कस्टर्ड पावडर, 150 ग्रॅम क्रीम, अर्धा-अर्धा चमचा व्हॅनिला व आइसक्रीम इसेन्स.

कृती: अंड्याचा पिवळा व पांढरा भाग वेगळा करा. पिवळा भाग, साखर, कस्टर्ड पावडर फेसून घ्या. त्यात गरम दूध घाला. मंद गॅसवर कस्टर्ड बनवा. वरीलप्रमाणे जिलेटिन घालून गार करा. इसेन्स घाला. पांढरा बलक खूप फेसून मिश्रणात घाला व चांगलं सेट करा. पुन्हा हॅन्डमिक्सरने घुसळून, क्रीम फेसून घाला व पुन्हा सेट करा. डब्यावर अँल्युमिनियम फॉईल किंवा झाकण ठेवा. याच मिश्रणात 2 चमचा कोको पावडर कस्टर्ड बनवताना घातल्यास चॉकलेट आइसक्रीम बनेल.