शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तूप्रमाणे शयनगृह (Bedroom) कसा असावा

'शयन गृह घराच्या नैऋत्य दिशेकडे असावे. इमारतीत अनेक माळे असल्याच शयन गृहाची जागा तळमजल्यावर असावी. 
 
पूजा करायची जागा किंवा छोटेखानी देऊळ शयन गृहात कधीही नसावे. बेड किंवा  डबल बेड शयन गृहाच्या नैऋत्य कोपर्‍यात असू द्या. 
 
शयन गृहात नेहमी चार पाय असलेला पलंग ठेवावा, कधीही बॉक्स पलंगचा वापर करू नका, कारण या मुळे पलंगाच्या खाली हवेचे वाहणे थांबून जाते. 
 
पलंगाला भिंतीला चिटकून ठेवण्याचे टाळावे. विजेची उपकरण शयन गृहाच्या आग्नेय दिशेत ठेवावी. 
 
शयन गृहाची दार पूर्व किंवा पश्चिम दिशेत असावी आणि आतल्या बाजूला उघडणारी असावी. शयन गृहाच्या खिडक्या ईशान्य दिशेत असाव्या. 
 
शयन गृहात भिंतीवरची रंगसंगती मवाळ रंगाची असावी. रात्री झोपतान शयन गृहात पूर्ण काळोख नसावा परंतु, मंद असा प्रकाश सर्वत्र पसरलेला असावा. 
 
मुलांची झोपण्याची खोली घराच्या उत्तर दिशेत असावी, ज्यायोगे त्यांना शांत साखर झोप मिळू शकेल. 
 
घराच्या वायव्येकडे पाहुण्यांसाठी एक वेगळा शयन गृह असावा. घराच्या मुख्य कर्त्या लोकांना शयन गृहाच्या नैऋत्येकडच्या कोपर्‍यात झोपायला हवे. शयन गृहात झोपताना डोके पूर्व किंवा दक्षिणे कडे ठेवावे.