शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुनुसार या 10 जागी राहू नये

एकांत स्थळी
अनेक लोक एकांत राहणे पसंत करतात. ज्यामुळे ते अगदी सुनसान जागी राहायला निघून जातात. भविष्य पुराणाप्रमाणे आपलं घर शहराहून बाहेर नसावं. गावात किंवा शहरात राहणे अधिक सुरक्षित असतं. कारण एकांत स्थळी घर असल्यास घरातून बाहेर पडताना आपल्या मनात सतत घराची काळजी असेल. याव्यतिरिक्त चोरीची भीती, रात्री बाहेर पडण्याची भीती सतत मनात राहील.

चौरस्त्यावर
अश्या जागी घर खरेदी करताना सतर्क व्हा. या जागेवर वास्तुदोष निर्मित होतो. चौरस्त्यावर घराच्या संबंधात तंत्र शास्त्रात ही जागा तमोगुण मानली आहे. येथे नकारात्मक ऊर्जा अधिक असते. येथे लोकांचे आणि वाहनांची वाहतूक असल्यामुळे मानसिक शांती भंग होते. घरात राहणार्‍यांमध्ये उत्तेजना बघायला मिळते.
 

बेकायदेशीर क्रियाकलाप चालत असलेल्या ठिकाणी
जर आपल्या घराजवळ मदिरालय, जुगार, मीटची दुकान किंवा इतर अनैतिक क्रियाकलाप संचलित होत असतील तर तिथे मुळीच राहू नये. याने आपल्या जीवनात कधीच शांती लाभणार नाही. याने आपल्या मुलांच्या भविष्यावरही नकारात्मक प्रभाव पडेल. 
 
अश्या जागी गुन्हेगार, तामसिक आणि नकारात्मक लोकांचे येणं-जाणं सुरू असतं. यामुळे संकटाला सामोरा जाऊ लागू शकतं.
 
सतत आवाज येत असलेल्या दुकान किंवा फॅक्टरीजवळ
जर आपलं घर ऑटो गॅरेज, फर्निचर निर्माण करणारी दुकान किंवा अश्याप्रकाराचे सतत मशीनीची आवाज येत असलेल्या दुकान किंवा फॅक्ट्रीजवळ असल्यास आपल्याला त्रास होऊ शकतो. हल्ली लोकं घरातच दास किंवा गायन क्लास सुरू करतात. जे इतर रहिवाशांसाठी त्रासदायक ठरतं. म्हणून अश्या गोष्टींकडे लक्ष देऊन त्यावर आपत्ती घ्यावी किंवा अश्या ठिकाणी राहणे टाळावे.

दबंग आणि प्रख्यात लोकांपासून दूर राहा
भविष्य पुराणानुसार जिथे राजा आणि त्यांचे सेवक निवास करतात तिथे घर बांधू नये. कारण त्यांच्या आपसात झालेल्या वादात आपण गुंडाळले जाऊ शकतात. राजाच्या महालाजवळ घर बांधू नये. कारण तिथे अनेक विशिष्ट लोकं येत असतात ज्यांच्यामुळे घरातील सदस्यांचे जीवन बाधित होऊ शकतं.
 
हल्ली राजा आणि सेवकांचे रूप बदलले आहेत आणि त्यांची जागा नेते आणि गुंड्यांनी घेतली आहे. अशात अती विशिष्ट अधिकारीही आपल्याला लहान समजून त्रास देऊ शकतो. म्हणून अश्या लोकांपासून दूर राहणे श्रेष्ठ ठरेल.

नेहमी आपल्या विचार आणि स्टेट्सला मेल खात असलेल्या लोकांसोबत राहणे योग्य ठरेल.
 
जागेची निवड करताना
घर बांधताना ती जागा बघावी. तिथली माती लाल, पिवळी, तपकिरी, काळी आहे की खडतर? उंदराचे बिल, फाटलेली, खडतर, गड्डे किंवा टिले असलेली भूमी त्यागून द्यावी. ज्या जागेवर गड्डा खोदल्यावर कोळसा, राख, हाड किंवा भूस दिसत आहे अश्या भूमीवर घर बांधून राहण्याने आयू घटते.
 
पूर्व, उत्तर आणि ईशान दिशेत खालील भूमी सर्व दृष्ट्या लाभदायक असते. आग्नेय, दक्षिण नैरृत्य, पश्चिम, वायव्य आणि मध्य मध्ये खालील भूमी रोग उत्पन्न करणारी असते. दक्षिण व आग्नेयच्या मध्य खालील आणि उत्तर व वायव्यच्या मध्य उंच भूमीचे नाव रोगकर वास्तू आहे, जी रोग उत्पन्न करते. म्हणून भूमी निवडताना वास्तू तज्ज्ञांकडून सल्ला घ्यायला हवा.

कॉलोनी बघा
जर आपण एखाद्या टॉउनशिप किंवा कॉलोनीत घर घेण्याचा विचार करत असाल तर आधी तेथील वास्तू आणि वातावरण समजून घ्या. तेथील लोकं कसे आहेत जाणून घ्या. तिथे काय सुविधा आहेत माहीत करून घ्या. जसे शाळा, रूग्णालय, मेडिकल शॉप, किराणा, पोलिस स्टेशन, वाटर सप्लाय, वीज सुविधा, स्वच्छता, सार्वजनिक वाहन सुविधा इतर. या सर्व गोष्ट आपल्या अनुकूल नसल्यास तेथे राहणे योग्य नाही. घर शहर किंवा कॉलोनीच्या पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला असावे.
 
नदी, पहाड नसलेल्या जागी राहू नये
आधी असे प्रचलित होते की घर त्या गावी असावे जिथे 1 नदी, 5 तलाव, 21 बावडी आणि 2 पहाड असतील. परंतू हल्ली घर बांधण्यासाठी पहाड कापले जात आहे आणि नद्या कोरड्या पडत आहे.
 
म्हणतात की दोन डोंगरात बसणारे शहर तुफान आणि वादळ या दृष्टीने सुरक्षित असतं आणि चारी मोसमात वातावरण संयमित ठेवतं. घर पहाडच्या उत्तरीकडे बांधावे.

मंदिर नसेल तिथे राहू नये
आपलं घर मंदिराजवळ असल्यास अती उत्तम. थोडं लांब असल्यास मध्यम आणि मंदिर जवळ नसल्यास निम्नतम असतं. आपण हे वाचलं असेल की मंदिराजवळ घर नसावा पण हा निव्वळ अंधविश्वास आहे.
 
खरं म्हणजे आपलं घर मंदिरापासून एवढं लांब असावं जिथून मंदिराच्या कामात कोणत्याही प्रकाराचे विघ्न येऊ नये आणि आपले दैनिक जीवनही बाधित नको व्हायला. मंदिराजवळ किंवा मंदिर परिसरात वास्तूप्रमाणे निर्मित घरातील लोकं सदैव सुखी असतात. तेथील राहणारे कुटुंब प्रगती करतात.
 
शहरातही व्यस्त बाजाराजवळ मंदिर असतात आणि मंदिराजवळ असणार्‍या दुकानात खूप व्यवसाय होतो. तिथे राहणारे लोकं खूप उन्नती करतात.
अनेकदा लोकं तर्क देतात की मंदिरातून येणार्‍या शंख, घंटी, मंत्र, आरती, लोकांची गर्दीमुळे येणार्‍या आवाजांमुळे ते त्रासलेले असतात पण हे उचित नाही. आध्यात्मिक वातावरणाला गोंगाट म्हणे योग्य नाही. मंदिराचे शहर हरिद्वार, मथुरा, उज्जैन आणि इतर जागी अनेक घरांजवळ मंदिर आहे आणि तेथील लोकं शांत चित्त आणि आध्यात्मिक भावाने संपन्न आहे.
 
नदी, तलावच्या काठी नसावं घर
याचे एकमेव कारण म्हणजे नदी आणि तलाव स्वच्छ राहिले पाहिजे आणि लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं. दुसरं कारण म्हणजे नदीत पुर येण्याचीही भीती असते म्हणून याच्याजवळ न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.