शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

धन हानीपासून बचाव करण्यासाठी स्वयंपाकघरात सोडू नये उष्टे भांडे

वास्तू आणि ज्योतिषाशी निगडित अशा काही गोष्टी आहे ज्याला आम्ही आपल्या रोजच्या जीवनात वापर करून घरात बरकत आणू शकतो. पुढे आम्ही तुम्हाला असे सोपे उपाय सांगत आहे ज्याचा प्रयोग करून तुम्ही देखील तुमचे भाग्य बदलू शकता -
 
1. घराच्या मुख्य दारासमोर कधीपण डस्टबिन नाही ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की असे केल्याने तुमचे शेजारीच तुमचे शत्रू बनू शकतात.  
2. स्वयंपाकघरात रात्री कधीही उष्टे भांडे नाही सोडायला पाहिजे. जर रात्री तुम्ही भांडे स्वच्छ करू शकत नसाल तर त्यांना फक्त पाण्याने धुऊन ठेवायला पाहिजे. असे केल्याने धन हानी होत नाही.  

3. सूर्यास्तच्या वेळी कुणालाही दूध, दही किंवा कांदे देऊ नये. अशी मान्यता आहे की यामुळे घरातील बरकत आणि सुख-समृद्धी समाप्त होते.  
4. रात्री झोपण्याअगोदर स्वयंपाकघरात एक बाल्टी पाणी भरून ठेवावे. असे केल्याने कर्ज लवकर फेडले जाते. तसेच बाथरूममध्ये देखील बाल्टीत पाणी भरून ठेवले तर जीवनात नक्कीच प्रगती कराल.

5. बिस्तर्‍यावर बसून कधीही जेवण नाही करायला पाहिजे. यामुळे घरातील शांती नष्ट होते आणि घरात राहणार्‍या लोकांवर कर्ज वाढण्याची शक्यता असते.  
6. कलश किंवा लहान पात्राला घरातील देवघरात नेहमी पाणी भरून ठेवावे. असे केल्याने घरात राहणार्‍या लोकांसाठी शुभ मानले जाते.